Join us  

Bank Saving Account : सेव्हिंग अकाऊंट बंद करण्यापूर्वी करा ‘ही’ पाच कामं, अन्यथा अडकेल संपूर्ण रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 7:57 PM

Bank Saving Account : ही कामं तुम्हाला आवर्जून करावी लागतील. नाहीतर तुमची संपूर्ण रक्कम अडकण्याची शक्यता आहे.

Bank Saving Account : जुने बँक खाते बंद करणे आणि नवीन उघडणे ही तशी चांगली गोष्ट आहे. परंतु त्यापूर्वी काही सावधगिरी देखील बाळगणे आवश्यक आहे. खबरदारी न घेतल्यास काही समस्याही निर्माण होऊ शकतात. जर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर जुने खाते तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. नवीन खाते उघडण्यापूर्वी तुम्ही एक चेकलिस्ट बनवावी. ज्यामध्ये जुने बचत खाते बंद करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचा समावेश असेल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला खाते बंद करण्यापूर्वी करायच्या आहेत.

ओटोमेटेड पेमेंट कॅन्सल करा

बचत खाते बंद करण्यापूर्वी, सर्व ऑटोमेडेट पेमेंट एकदा तपासा आणि ते बंद करा. तसेच, ही पेमेंट रिक्वेस्ट नवीन खात्यात सुरू करण्यासाठी, बँकेत फॉर्म भरा. ऑटोमेटेड पेमेंटमध्ये तुमची बिले आपोआप भरली जातात. जर तुम्ही जुने खाते नवीन खात्यात हस्तांतरित न करता बंद केले तर बिल भरण्यात अडचण येऊ शकते.

सर्व स्टेटमेंट बॅकअप ठेवा

बचत खाते बंद करण्यापूर्वी, एकदा सर्व स्टेटमेंटचा बॅकअप घ्या. त्यानंतर तुमच्या बँक स्टेटमेंटचीही गरज भासू शकते. नंतर बँकेकडून पत्र आले, टॅक्सबाबत गोंधळ झाला, अशा स्थितीत बँकेचा बॅकअप असेल तर चालेल. स्टेटमेंटची प्रिंटआउट घ्या किंवा सॉफ्ट कॉपी सेव्ह करा.

नवीन खातं उघडा

जर तुमच्याकडे बचत खाते नसेल तर जुने खाते बंद करू नका. जर खाते नसेल तर जुने खाते बंद करण्यापूर्वी नवीन उघडा. डेबिट कार्ड, चेकबुक मिळेपर्यंत संपूर्ण पैसे त्या खात्यात एकाच वेळी जमा करू नका. जोपर्यंत तुम्हाला पैसे काढण्याचा मार्ग सापडत नाही तोपर्यंत संपूर्ण रक्कम नवीन खात्यात जमा करू नका.

बॅलन्स चेक करा

जर खात्यातील बॅलन्स तुमचा निगेटिव्हमध्ये असेल तर जोवर तुम्ही सर्व चार्जेस भरत नाही, तोवर बँक तुम्हाला खाते बंद करू देणार नाही. जेव्हा तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवला जात नाही तेव्हा ते निगेटिव्हमध्ये जातं. यासाठी खातं बंद करण्यापूर्वी बॅलन्स चेक करा. खातं निगेटिव्हमध्ये गेल्यास सर्व शुल्क देऊन ते सुरू करा आणि त्यानंतर बंद करा.

खाते नंबर अपडेट करा

जेव्हा तुम्ही जुनं खातं बंद करून नवं खातं सुरू करता तेव्हा ज्या ज्या ठिकाणी जुन्या खात्याचा क्रमांक दिला आहे त्या ठिकाणी तो अपडेट करा. उदा. कंपनीत, आयटीआर, गॅस एजन्सी. या ठिकाणी तुमच्या खात्याचा वापर होतो. यासाठी नव्या खात्याची आवश्यक माहिती देणं गरजेचं आहे.

टॅग्स :बँक