Lokmat Money >बँकिंग > १ जानेवारीपासून बँकांच्या वेळा बदलणार, देशात असा बदल करणारे पहिलचं राज्य

१ जानेवारीपासून बँकांच्या वेळा बदलणार, देशात असा बदल करणारे पहिलचं राज्य

bank timing change : देशभरातील बँकांच्या वेगवेगळ्या उघडण्याच्या वेळांमुळे गोंधळ आणि निराशा आहे, या हालचालीमुळे इतर राज्यांनाही असेच बदल स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 13:28 IST2024-12-18T13:27:53+5:302024-12-18T13:28:31+5:30

bank timing change : देशभरातील बँकांच्या वेगवेगळ्या उघडण्याच्या वेळांमुळे गोंधळ आणि निराशा आहे, या हालचालीमुळे इतर राज्यांनाही असेच बदल स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते.

bank timing change in madhya pradesh from coming january 1 | १ जानेवारीपासून बँकांच्या वेळा बदलणार, देशात असा बदल करणारे पहिलचं राज्य

१ जानेवारीपासून बँकांच्या वेळा बदलणार, देशात असा बदल करणारे पहिलचं राज्य

bank timing change : देशातील डिजिटल क्रांतीमुळे आता बँकेत जाण्याची जास्त गरज पडत नाही. मात्र, काही कामे अशी आहेत, जी बँकेत गेल्याशिवाय होत नाही. तुम्हाला जर बँकांमध्ये रोज किंवा अधूनमधून जाण्याची वेळ पडत असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आजच्या काळात बँकांचा उपयोग फक्त पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्यासाठीच होत नाही तर इतर अनेक कामांसाठीही केला जातो. प्रत्येक बँक उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ वेगवेगळी असू शकते. त्यामुळे अनेक वेळा लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत बँकिंग सेवा सुधारण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आता मध्य प्रदेशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ सारखीच असेल.

हा बदल १ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. या तारखेपासून सर्व बँका सकाळी १० वाजता उघडतील आणि दुपारी ४ वाजता बंद होतील. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली असून या पाऊलामुळे बँकिंग सेवा सुव्यवस्थित होण्यास मदत होईल, असा विश्वास समितीला आहे.

बँकांच्या वेळेत बदल करण्याची आवश्यकता का?
वेगवेगळ्या बँकांच्या वेगवेगळ्या वेळा असल्याने ग्राहकांना प्रचंड गोंधळाला सामोरे जावे लागत आहे. काही बँका सकाळी १० वाजता उघडतात, तर काही सकाळी १०:३० किंवा ११ वाजता उघडतात. अशा परिस्थिती २ वेगवेगळ्या बँकेत खाती असणाऱ्या ग्राहकांना अडचणीचे ठरत होते. ग्राहक आता वेगवेगळ्या बँकेच्या वेळापत्रकानुसार कोणत्याही नियोजनाशिवाय सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देऊ शकतात. एकसमान वेळापत्रक असण्याने गोंधळ उडणारन नाही. त्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे होणार असून ग्राहकांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

बँकांमध्ये उत्तम समन्वय
सर्व बँका एकाच वेळी काम करत असल्याने, आंतर-बँक व्यवहार आणि ग्राहक संदर्भ यासारख्या सेवांमध्ये उत्तम समन्वय असेल. याचा फायदा कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. कारण यामुळे ऑफिस शिफ्टचे उत्तम नियोजन होण्यास मदत होईल आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल. मध्य प्रदेशचे हे पाऊल भारतातील इतर राज्यांमध्येही अवलंबले जाऊ शकते. देशभरातील बँकांच्या वेगवेगळ्या उघडण्याच्या तासांमुळे गोंधळ आणि निराशा आहे, या हालचालीमुळे इतर क्षेत्रांनाही असेच बदल स्वीकारण्यास प्रेरणा मिळू शकते.
 

Web Title: bank timing change in madhya pradesh from coming january 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.