Join us

गेल्या 10 वर्षात बँकिंग क्षेत्रातील नफा 3 लाख कोटींच्या पुढे, पंतप्रधान मोदींनी दिली माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 7:53 PM

एकीकडे जगातील अनेक देश आर्थिक मंदीच्या छायेत आले आहेत, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.

Banking Sector Net Profit: एकीकडे जगभरातील अनेक देश आर्थिक मंदीच्या छायेत आले आहेत, तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत रेटिंग एजन्सी आणि IMF कडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. अशातच, भारतीय बँकिंग क्षेत्राबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गेल्या 10 वर्षातील भारतीय बँकिंग क्षेत्राची माहिती ट्विट केली.

बँकिंग क्षेत्राने इतिहास रचलाभारतीय बँकिंग क्षेत्राने 2023-24 या आर्थिक वर्षात 3 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा समावेश आहे. तर 2023 या आर्थिक वर्षात बँकांचा निव्वळ नफा 2.2 लाख कोटी रुपये होता. खाजगी क्षेत्रातील बँकांनी 1.4 लाख कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी 1.7 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

10 वर्षांत भारतीय बँकांचे चित्र बदललेबँकिंग क्षेत्राच्या विक्रमी नफ्याबद्दल ट्विट करताना पीएम मोदींनी लिहिले की, गेल्या 10 वर्षांत भारताच्या बँकिंग क्षेत्रात अभूतपूर्व बदल झाले आहेत. एनडीए सरकार सत्तेवर येण्यापूर्वी भारतीय बँकांवर एनपीएचा प्रचंड दबाव होता. यूपीएच्या फोन-बँकिंग धोरणामुळे भारतीय बँकांना प्रचंड तोटा आणि उच्च एनपीएचा सामना करावा लागला. गरिबांसाठी बँकांचे दरवाजे बंद झाले. आता बँकांच्या सुधारणामुळे गरीब, शेतकरी आणि एमएसएमईंना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत होईल. 

टॅग्स :नरेंद्र मोदीव्यवसायबँकिंग क्षेत्रबँक