Lokmat Money >बँकिंग > फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर! 

फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर! 

whatsapp banking services : या डिजिटल बँकिंगद्वारे, ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती, बॅलन्स इंक्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या बिगर-वित्तीय बँकिंग सेवांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 07:05 PM2022-10-06T19:05:35+5:302022-10-06T19:06:10+5:30

whatsapp banking services : या डिजिटल बँकिंगद्वारे, ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती, बॅलन्स इंक्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या बिगर-वित्तीय बँकिंग सेवांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

banking services on whatsapp check all bank whatsapp number list | फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर! 

फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर! 

नवी दिल्ली : ग्राहकांना घरी बसून बँकेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल बँकिंग हे सर्वात योग्य माध्यम आहे. ही सुविधा अधिक सोयीस्कर करण्यासाठी अनेक बँकांनी व्हॉट्सअॅप बँकिंग सुरू केले आहे. या डिजिटल बँकिंगद्वारे, ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती, बॅलन्स इंक्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या बिगर-वित्तीय बँकिंग सेवांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. 

तुम्हालाही या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर दिलेल्या लिस्टमधून तुमचा बँक नंबर फोनमध्ये सेव्ह करा. दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी (HDFC), आयसीआयसीआय (ICICI), बँक ऑफ बडोदा (BOI), अॅक्सिस बँक (Axis Bank) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) सारख्या सर्व प्रमुख बँका आपल्या ग्राहकांना Whatsapp बँकिंग सुविधा देत आहे.

SBI Whatsapp Banking services :
स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी WhatsApp Banking सेवा सुरू केली आहे. SBI WhatsApp बँकिंग सेवेसह बँक खाते सक्रिय करण्यासाठी, तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून SMS WAREG A/C No लिहून 917208933148 वर पाठवा. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्ही SBI ची WhatsApp सेवा वापरू शकाल.

PNB Whatsapp Banking services :
पंजाब नॅशनल बँकने (PNB)  3 ऑक्टोबर रोजी सांगितले की, त्यांनी ग्राहक आणि गैर-ग्राहक दोघांसाठी WhatsApp द्वारे बँकिंग सेवा सुरू केली आहे. बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, WhatsApp वर बँकिंग सुविधा अॅक्टिव्ह करण्यासाठी ग्राहकांनी अधिकृत बँकेच्या WhatsApp नंबर 919264092640 ला सेव्ह करणे आवश्यक आहे आणि या नंबरवर हाय/हॅलो पाठवून संभाषण सुरू करणे आवश्यक आहे.

HDFC Bank Whatsapp Banking services :
एचडीएफसी बँकेने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये 70700 22222 नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला WhatsApp वर ' Hi' पाठवावे लागेल. WhatsApp वर एचडीएफसी बँक चॅट बँकिंगद्वारे 90 हून अधिक व्यवहार आणि सेवा उपलब्ध आहेत.

ICICI Bank Whatsapp Banking services :
आयसीआयसीआय बँकेच्या WhatsApp बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 8640086400 हा नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाइल नंबरवरून 8640086400 या नंबरवर 'Hi' म्हणावे लागेल. तुम्ही WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या मोबाईल स्क्रीनवर सुरक्षित आणि इंटरेक्टिव्ह मेनू मिळवून संभाषण सुरू करण्यासाठी 9542000030 वर मिस्ड कॉल किंवा एसएमएस देखील करू शकता.

Axis Bank Whatsapp Banking services :
जर तुम्ही अॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला WhatsApp सेवांचा लाभ घेण्यासाठी 7036165000 वर 'Hi' लिहून मेसेज करावा लागेल. सदस्यता घेतल्यानंतर तुम्ही खाती/चेक, क्रेडिट कार्ड, मुदत ठेवी आणि कर्ज यांसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकता.
 

Web Title: banking services on whatsapp check all bank whatsapp number list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.