Lokmat Money >बँकिंग > बॅंका झाल्या श्रीमंत, आता मदत नकाे!

बॅंका झाल्या श्रीमंत, आता मदत नकाे!

नव्या अर्थसंकल्पात सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना नवे भांडवल मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 06:53 AM2023-01-23T06:53:30+5:302023-01-23T06:53:44+5:30

नव्या अर्थसंकल्पात सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना नवे भांडवल मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Banks became rich do not help now | बॅंका झाल्या श्रीमंत, आता मदत नकाे!

बॅंका झाल्या श्रीमंत, आता मदत नकाे!

नवी दिल्ली :

नव्या अर्थसंकल्पात सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना नवे भांडवल मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
बॅंकांचे भांडवल उपलब्धता प्रमाण सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. सध्या हे प्रमाण १४ ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सरकारी बॅंका बाजारातून भांडवल गाेळा करत असून अनावश्यक मालमत्तांची विक्रीदेखील करत आहेत तसेच बॅंकांचा नफादेखील वाढला आहे. त्यामुळे बॅंकांसमाेर निधीची टंचाई नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बॅंकांना भांडवल पुरवठा केला हाेता. त्यावेळी पूरक मागण्यांद्वारे २० हजार काेटी रुपयांचे भांडवल दिले हाेते. त्यापैकी माेठा हिस्सा बाॅण्डद्वारे गाेळा केला हाेता.

३.१० लाख काेटी रुपयांचे भांडवल २०१६ ते २०२१ या कालावधीत पुरविले
पहिल्या सहामाहीत ४१ हजार काेटींचा नफा
सरकारी बॅंकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुमारे ४१ हजार काेटी रुपयांचा नफा कमाविला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ३२ टक्के वाढ झाली आहे.

Web Title: Banks became rich do not help now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.