नवी दिल्ली :
नव्या अर्थसंकल्पात सरकारकडून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना नवे भांडवल मिळण्याची शक्यता फार कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बॅंकांचे भांडवल उपलब्धता प्रमाण सध्या आवश्यकतेपेक्षा जास्त आहे. सध्या हे प्रमाण १४ ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सरकारी बॅंका बाजारातून भांडवल गाेळा करत असून अनावश्यक मालमत्तांची विक्रीदेखील करत आहेत तसेच बॅंकांचा नफादेखील वाढला आहे. त्यामुळे बॅंकांसमाेर निधीची टंचाई नाही, असे सूत्रांनी सांगितले.
सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये बॅंकांना भांडवल पुरवठा केला हाेता. त्यावेळी पूरक मागण्यांद्वारे २० हजार काेटी रुपयांचे भांडवल दिले हाेते. त्यापैकी माेठा हिस्सा बाॅण्डद्वारे गाेळा केला हाेता.३.१० लाख काेटी रुपयांचे भांडवल २०१६ ते २०२१ या कालावधीत पुरविलेपहिल्या सहामाहीत ४१ हजार काेटींचा नफासरकारी बॅंकांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सुमारे ४१ हजार काेटी रुपयांचा नफा कमाविला आहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ३२ टक्के वाढ झाली आहे.