लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : सरकारी आणि खासगी बँकांचे तिमाही निकाल जाहीर हाेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार, बहुतांश बँकांच्या नफ्यात वाढ झालेली दिसत आहे. ही बँकांसाठी सुखावणारी बाब असली तरीही एका गाेष्टीमुळे बँकांचे टेन्शन वाढणार आहे. ती म्हणजे, कर्जबुडव्यांची वाढती संख्या. बुडीत कर्जांमध्ये ५० हजार काेटी रुपयांची वाढ झाली असून, हा आकडा आता ३.५ लाख काेटी रुपयांवर गेला आहे. अशा कर्जबुडव्यांना कसे हताळावे, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे काम आरबीआयतर्फे हाती घेण्यात आले आहे.
‘ट्रान्सयुनियन सिबिल’ या संस्थेने थकीत कर्जांसंदर्भात अहवाल जारी केला आहे. त्यात ३१ मार्च २०२३ राेजी संपलेल्या आर्थिक वर्षातील आकडेवारीचा आधार घेऊन तुलना करण्यात आली आहे.
कर्जबुडवे वाढले
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कर्ज बुडविणाऱ्या खात्यांमध्ये २ हजारांची वाढ झाली आहे. डिसेंबर २०२० पासून या संख्येत दरवर्षी सरासरी १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ हाेत आहे.
७७ % सर्वाधिक कर्जबुडवे राष्ट्रीयीकृत बँका आणि एसबीआयचे खातेदार आहेत.
सर्व प्रकारच्या बँकांचे कर्जबुडवे
n३६,१५० कर्जबुडव्यांकडे १ काेटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी.
n१६,६५७ कर्जबुडव्यांकडे २५ लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी.
थकबाकी जास्त (कोटी रु.)
एसबीआय ७९,२७१ रु.
पीएनबी ४१,३५३ रु.
युनियन बँक ३५,६२३ रु.
आयडीबीआय २४,१९२ रु.
बीओबी २२,७५४ रु.
खासगी बँका ३०,८०९ रु.
काेण आहेत कर्जबुडवे?
n२५ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज बुडविणारे विलफुल डिफाॅल्टर, तर १ काेटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज थकीत ठेवणारे माेठे कर्जबुडवे
nअशी खाती एनपीए श्रेणीत गेल्यानंतर सहा महिन्यांच्या आत कर्जबुडवे जाहीर करावे लागतील.