Join us  

जानेवारी महिन्यात ८ दिवस बँका बंद, लवकर कामकाज आटोपून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 6:38 AM

रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादी

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारीमध्ये देशभरातील बँकांना आठ दिवसांची सुट्टी मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३ या वर्षासाठीचे बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे.

जानेवारीत बँकांना देशपातळीवर आठ दिवसांची सुट्टी मिळणार असली तरी, याच महिन्यात स्थानिक महत्त्वपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर मिझोराम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, हरयाणा, राजस्थान, आसाम, आदी राज्यांत विशिष्ट दिवशी बँकांना स्थानिक सुट्ट्या असतील. या सुट्ट्यांमुळे आंतरराज्यीय बँकिंग व्यवहारांवर काही प्रमाणात परिणाम होताना दिसेल. बँकांना सुट्टी असली तरी त्याचा कोणताही परिणाम ऑनलाइन बँकिंग, मोबाईल बँकिंग यांच्यावर होणार नाही. तसेच एटीएममध्येदेखील नियोजनबद्ध पद्धतीने रोख रक्कम उपलब्ध असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अशी असेल जानेवारी महिन्यात बँकांना सुट्टी     १ जानेवारी  - नववर्ष (रविवार)     ८ जानेवारी - रविवार     १४ जानेवारी - दुसरा शनिवार     १५ जानेवारी - रविवार     २२ जानेवारी - रविवार     २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन     २८ जानेवारी - चौथा शनिवार     २९ जानेवारी - रविवार

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक