Join us

क्रेडिट कार्डनं रेंट भरत असाल तर व्हा सावध, कुठे CIBIL स्कोअरवर तर होत नाहीये ना परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:09 AM

भाडं भरणं हा आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वात मोठा मासिक खर्च आहे. यासाठी अनेकदा घरच्या बजेटमध्ये अनेक अॅडजस्टमेंट्सही कराव्या लागतात.

भाडं भरणं हा आपल्यापैकी बहुतेकांसाठी सर्वात मोठा मासिक खर्च आहे. यासाठी अनेकदा घरच्या बजेटमध्ये अनेक अॅडजस्टमेंट्सही कराव्या लागतात. काही वेळा रोख रकमेअभावी भाडं भरण्यात अडचण येते. अशा परिस्थितीत, आपण क्रेडिट कार्ड वापरून भाडं भरण्याचा विचार करू लागतो. परंतु, अशी पेमेंट्स तुमचं आर्थिक आरोग्य बिघडू शकतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल असं कसं होऊ शकतं? दुसरा पर्याय नसेल तर काय करावं? भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू नये का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. 

सर्वप्रथम, जे क्रेडिट कार्डचं बिल नियमितपणे भरतात त्यांच्यासाठी, त्या माध्यमातून भाडं भरणं ही सोय ठरू शकते. तथापि, शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून भाडं भरल्यास, परिस्थिती वेगळी होते. तेव्हा तुमच्याकडे आपला बॅलन्स भरण्यासाठी रक्कम पुरेशी राहत नाही. जर शिल्लक रक्कम वेळेवर भरली नाही तर त्याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय जास्त व्याज आकारलं जाऊ शकतं. 

वापर नाईलाज आहे का? 

अशावेळी, तुम्हाला हे समजून घेणं आवश्यक आहे की क्रेडिट कार्डद्वारे भाडं भरल्यानं तुम्हाला तात्पुरत्या स्वरुपात आर्थिक संकट टाळता येऊ शकतं. कारण शेवटी तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरावंच लागणार आहे. याशिवाय, तुम्ही लक्षात घ्या की क्रेडिट कार्डच्या थकबाकीवर आकारण्यात येणारं व्याज खूप जास्त आहे. तुम्ही ईएमआय पर्याय निवडला तरीही ते अधिकच असेल. तुम्ही तुमचं भाडं भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागू शकतं. याचा वार्षिक दर सुमारे ३०-४०% असू शकतं. हे तेव्हाच उपयोगी पडू शकतं जेव्हा तुमच्याकडे  त्यावेळी पैसे उपलब्ध नसतील. 

कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं? 

शुल्क - सामान्यपणे तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून भाडं भरणं टाळलं पाहिजे. परंतु, आपण अद्याप त्याचा वापर करून पेमेंट करत असल्यास, आपल्याला एक गोष्ट माहित असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची देय रक्कम वेळेवर भरण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्हाला अधिक रक्कम भरावी लागेल. याव्यतिरिक्त, क्रेडिट कार्ड वापरून भाडं भरण्यासाठी अनेकदा प्रोसेसिंग फी आकारली जाते. याचा अर्थ तुम्ही तुमच्या सोयीसाठी तुमच्या भाड्यापोटी अधिक पैसे द्याल. 

क्रेडिट स्कोअर - तुमचा सीयुआर किती महत्त्वाचा आहे हे तुम्हाला माहितीये का? सीयुआर किंवा क्रेडिट युटिलायझेशन रेश्यो एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. ज्याच्यामुळे क्रेडिट स्कोअरवर परिणाम होते. क्रेडिट कार्डाचा वापर करून जर तुम्ही रेंट भरत असाल तर क्रिडिट युटिलायझेशन रेश्योही वाढेल. हा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करेल. 

इंटरेस्ट पेमेंट - जर तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्डाचं पेमेंट केलं तर त्यावर लागणारं व्याज वाढू शकतं. तुम्हाला प्रोसेसिंग शुल्काशिवाही मोठं व्याजही द्यावं लागेल.

टॅग्स :बँकसुंदर गृहनियोजन