Lokmat Money >बँकिंग > फोनमध्ये Sova व्हायरस घुसला तर होईल बँक खाते रिकामे; एसबीआयकडून सतर्कतेचा इशारा

फोनमध्ये Sova व्हायरस घुसला तर होईल बँक खाते रिकामे; एसबीआयकडून सतर्कतेचा इशारा

SOVA Trojan : हा एक व्हायरस आहे, जो तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतो आणि तुमची मौल्यवान मालमत्ता चोरू शकतो, असे एसबीआयने म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 11:59 AM2022-10-03T11:59:47+5:302022-10-03T12:16:55+5:30

SOVA Trojan : हा एक व्हायरस आहे, जो तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतो आणि तुमची मौल्यवान मालमत्ता चोरू शकतो, असे एसबीआयने म्हटले आहे.

before downloading any app read this warning of sbi otherwise it will be a big hit | फोनमध्ये Sova व्हायरस घुसला तर होईल बँक खाते रिकामे; एसबीआयकडून सतर्कतेचा इशारा

फोनमध्ये Sova व्हायरस घुसला तर होईल बँक खाते रिकामे; एसबीआयकडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : तुम्ही कोणत्याही गैर-विश्वसनीय सोर्सवरून कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करत असाल तर हा इशारा फक्त तुमच्यासाठी आहे. एसबीआयने (SBI) एका ट्विटमध्ये लोकांना सोवा ट्रोजन (SOVA Trojan) व्हायरसबद्दल सावध केले आहे. 

हा एक व्हायरस आहे, जो तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतो आणि तुमची मौल्यवान मालमत्ता चोरू शकतो, असे एसबीआयने म्हटले आहे. हा इशारा विशेषतः अँड्राईड युजर्ससाठी जारी करण्यात आला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, हा व्हायरस गुप्तपणे अँड्रॉईड फोन एन्क्रिप्ट करू शकतो आणि तो अनइन्स्टॉल करणे कठीण आहे. तसेच, एसबीआयच्या मते, नेहमी विश्वसनीय अॅप्स विश्वसनीय सोर्सकडून डाऊनलोड करा.

काय आहे सोवा ट्रोजन?
एसबीआयच्या इशाऱ्यानुसार, हा एक ट्रोजन मालवेअर आहे, जो बनावट बँकिंग अ‍ॅप वापरून लोकांच्या वैयक्तिक डेटावर हल्ला करतो आणि चोरी करतो. हा तुमची गुप्त आर्थिक माहिती चोरू शकते. जेव्हा युजर्स आपले नेट बँकिंग अ‍ॅप वापरत असतात, तेव्हा हा मालवेअर त्यांचे क्रेडेंशियल्स रिकॉर्ड करतो. हा मालवेअर बाहेर काढणे खूप कठीण काम आहे.

अशाप्रकारे काम करतो सोवा ट्रोजन
पहिल्यादा सोवा ट्रोजन तुमच्या फोनमध्ये बनावट एसएमएसद्वारे इन्स्टॉल केले जाते. इन्स्टॉलेशननंतर हे ट्रोजन तुमच्या फोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्सची माहिती हॅकर्सना पाठवते. हॅकर्स कमांड आणि कंट्रोलद्वारे तुमच्या फोनवर व्हायरस पाठवतात. यासह, एक लिस्ट देखील पाठविली जाते, ज्यामध्ये टारगेट अ‍ॅप्स लिहिलेले असतात. आता जेव्हा तुम्ही हे अ‍ॅप्स वापरता तेव्हा व्हायरस त्याचा डेटा XML फाईलमध्ये साठवतो, ज्यात हॅकर्सद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो.

असे व्हा सावध...
एकदा हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये शिरला की, तो काढून टाकणे खूप अवघड असते. हे टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे सावधगिरी बाळगणे. संशयास्पद असे कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करू नका. तसेच, अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी केवळ विश्वसनीय सोर्स वापरा. एखादे अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू वाचा. अ‍ॅपला परवानगी देण्यापूर्वी, तुम्ही काय परवानगी देत ​​आहात याची माहिती पूर्णपणे वाचा.

Web Title: before downloading any app read this warning of sbi otherwise it will be a big hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.