रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. जेव्हा जेव्हा एखादी बँक रिझर्व्ह बँकेच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन आपलं कामकाज करते तेव्हा रिझर्व्ह बँक त्यावर दंड आकारू शकते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं आता पंजाब नॅशनल बँक (PNB), फेडरल बँक, मर्सिडिज बेंझ फायनान्शिअल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Mercedes Benz Financial Services India Private Limited) आणि कोसामट्टम फायनान्स लिमिडेटला (Kosamttam Finance Limited, Kottayam) वर दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.
रिझर्व्ह बँकेनं शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. रिझर्व्ह बँकेनं पीएनबीवर ७२ लाख रुपये आणि फेडरल बँकेवर ३० लाख रुपये दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेनं मर्सिडीज बेंझ फायनान्शियल सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडवर आपल्या केवायसी निर्देश, २०१६ च्या काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.