Lokmat Money >बँकिंग > रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार

रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 11:14 AM2023-12-08T11:14:27+5:302023-12-08T11:15:32+5:30

रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

Big decision of RBI now payment of 5 lakhs can be made through UPI schools and hospitals place | रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार

रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, आता 'या' ठिकाणी UPI द्वारे ५ लाखांचं पेमेंट करता येणार

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीतील निर्णयांची घोषणा केली. यावेळी त्यांनी सलग पाचव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात रेपो दरात अखेरची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर सलग पाचव्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्यात आलाय. याशिवाय त्यांनी युपीआय ट्रान्झॅक्शन लिमिटबाबत मोठी घोषणा केली. 

पतधोरण समितीच्या बैठकीनंतर शुक्रवारी शक्तिकांत दास यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना युपीआय ट्रान्झॅक्शनबाबत मोठी घोषणा केली. रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये युपीआयद्वारे आता एका वेळी ५ लाख रुपयांपर्यंत पेमेंट केलं जाऊ शकतं, अशी माहिती दास यांनी यावेळी दिली. 

... वाट पाहावी लागणार
६ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक पार पडली. पतधोरण समितीच्या ६ पैकी ६ सदस्यांनी रेपो दर कायम ठेवण्याच्या बाजूनं मत दिल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळे होम लोन किंवा अन्य कर्जांच्या ईएमआयवर कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु व्याजदर कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांना आणखी थोडं थांबावं लागणार आहे.

Web Title: Big decision of RBI now payment of 5 lakhs can be made through UPI schools and hospitals place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.