Join us  

Bank of Baroda च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी; RBI ची मोठी अ‍ॅक्शन, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 1:24 PM

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली आहे.

RBI Bank of Baroda : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) बँक ऑफ बडोदावर मोठी कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ बडोदाच्या 'BoB वर्ल्ड' मोबाईल अ‍ॅपवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. BoB ला तात्काळ प्रभावानं नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घालण्यात आलीये. या आदेशानंतर नवीन ग्राहक ‘BoB वर्ल्ड’ अॅपसह जोडले जाऊ शकणार नाहीत.

रिझर्व्ह बँकेनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे यासंदर्भातील माहिती दिलीये. बँक ऑफ बडोदाविरोधात बँकिंग रेग्युलेश अ‍ॅक्टचे कलम ३५ए, १९४९ अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचं म्हटलं. रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ बडोदाला 'BoB वर्ल्ड' मोबाइल अ‍ॅपवर आपल्या ग्राहकांना तात्काळ प्रभावानं एन्ट्री देण्यास मनाई केली आहे.ही कारवाई या मोबाइल अ‍ॅपवर आपल्या ग्राहकांना सहभागी करून घेण्याच्या पद्धतीत दिसून आलेल्या काही चिंतांवर अवलंबून आहे. याचा परिणाम त्या लोकांवर होणार आहे, ज्यांच्याकडे बँकेत अकाऊंट आहे, परंतु त्यांनी या अ‍ॅपचा वापर सुरू केलेला नाही. बँकेच्या या अ‍ॅपवर युझर्सना इंटरनेट बँकिंगशिवाय युटिलिटीशी निगडीत पेमेंट, तिकीट, आयपीओ सबस्क्रिप्शन अशा सुविधा मिळतात.

जुन्या ग्राहकांवर परिणाम नाहीदरम्यान, बँक ऑफ बडोदाच्या या अ‍ॅपसोबत नवे ग्राहक जोडले जाऊ शकणार नाहीत. परंतु जुन्या ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. जुन्या ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ बडोदाला दिल्यात.अ

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक