Join us

PNB News : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! ५ दिवसांत करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 2:20 PM

Punjab National Bank Dormant Account Alert: नॅशनल बँकेच्या (PNB) कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे ५ दिवसांचा अवधी आहे.

Punjab National Bank Dormant Account Alert: नॅशनल बँकेच्या (PNB) कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. यासाठी बँकेच्या ग्राहकांकडे ५ दिवसांचा अवधी आहे. जर तुम्हाला तुमचे निष्क्रिय खातं सक्रिय ठेवायचं असेल तर ३० जूनपर्यंत हे काम पूर्ण करणं आवश्यक आहे. अन्यथा १ जुलै रोजी ग्राहकांचं खातं बंद होऊ शकतं. ज्यांनी बऱ्याच दिवसापासून खातं वापरलं नाही अशा ग्राहकांना पीएनबी यासंदर्भात नोटीस पाठवत आहे.

खाती १ जुलैपासून बंद होणार

पीएनबीने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना अशा खात्यांसाठी केवायसी करण्याची सूचना केली होती. मात्र, बँकेनं ही मुदत ३० जून २०२४ पर्यंत वाढवली आहे. त्यानंतर १ जुलैपासून ही खाती बंद करण्यात येणार आहेत. जी खाती बऱ्याच काळापासून वापरली गेली नाहीत अशा खात्यांचा अनेक स्कॅमर्स गैरवापर करत असतात. अशा प्रकरणांना सामोरं जाण्यासाठी बँकेनं हे मोठं पाऊल उचललं आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ३० एप्रिल २०२४ च्या आधारे खात्याची गणना केली जाईल. अशा ग्राहकांना बँकेनं यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत.

केवायसी करून खाती पुन्हा सक्रिय होतील

बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खातं निष्क्रिय झालं आणि ग्राहकाला खातं पुन्हा सक्रिय करायचं असेल तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही लावावी लागतील. यानंतर त्यांचं अकाऊंट अॅक्टिव्हेट होईल. बँकेला भेट देऊन यासंदर्भातील अधिक माहिती मिळू शकते.

जर तुमचे पीएनबी बँकेत बचत खातं असेल तर आधी त्याची स्थिती तपासा. पीएनबी या महिन्याच्या अखेरीस ३० जून २०२४ पर्यंत अशी खाती बंद करणार आहे. ज्या खात्यांमध्ये गेल्या ३ वर्षांपासून कोणताही व्यवहार झाला नाही. तसंच ज्यांच्या खात्यातील शिल्लक गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये आहे. ती खाती बंद करण्यात येणार आहेत. अशा ग्राहकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. नोटीस पाठवल्यानंतर एक महिन्यानंतर ती खाती बंद केली जातील. ती खाती सुरू ठेवायची असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन तातडीनं केवायसी करून घ्यावी. अन्यथा १ जुलै २०२४ रोजी ही बँक खाती बंद केली जातील, असं पंजाब नॅशनल बँकेनं म्हटलंय.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँक