HDFC Home Loan Interest Rate: देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसीच्या (HDFC Bank) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. एचडीएफसीनं ठराविक कालावधीच्या कर्जावरील एमसीएलआरमध्ये बदल केला आहे. बँकेच्या एमसीएलआरमधील बदलामुळे होम लोन, पर्सनल लोन आणि कार लोनसह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनच्या ईएमआयवर परिणाम होतो. हे नवे दर ७ मे २०२४ पासून लागू झाले आहेत.
एचडीएफसी बँकेचे नवे एमसीएलआर दर
- एचडीएफसी बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर ८.९५ टक्के आहे.
- एक महिन्याचा एमसीएलआर ९ टक्के आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही.
- तीन महिन्यांचा एमसीएलआरही ९.१५ टक्क्यांवर कायम राहणार आहे.
- सहा महिन्यांचा एमसीएलआर ९.३० टक्के आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
- एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.३० टक्के आहे. कोणताही बदल झालेला नाही.
- २ वर्षांहून अधिक कालावधीसाठी एमसीएलआर ९.३५ टक्के करण्यात आला आहे.
- ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.३५ टक्के आहे. त्यातही बदल करण्यात आलेला नाही.
असा ठरवला जातो MCLR
एमसीएलआर ठरवताना डिपॉझिट रेट, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट आणि कॅश रिझर्व्ह रेशो राखण्याचा खर्च यासह अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. रेपो दरातील बदलांचा परिणाम एमसीएलआर दरावर होतो. एमसीएलआरमधील बदलांमुळे कर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो, ज्यामुळे कर्जदारांचा ईएमआय वाढतो.
लोनच्या ईएमआयवर परिणाम
एमसीएलआरमधील वाढ आणि घट याचा परिणाम होम लोन, कार लोन, पर्सनल लोनसह त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरावर होतो. एमसीएलआर वाढल्यास ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागतो. तर नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागडं कर्ज मिळतं.