रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) देशातील सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवते. जेव्हा जेव्हा एखादी बँक RBI च्या नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करते तेव्हा रिझर्व्ह बँक त्यावर दंड आकारू शकते. दरम्यान, आता रिझर्व्ह बँकेनं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला (Paytm Payments Bank Ltd) KYC नियमांसह काही तरतुदींचं पालन न केल्याबद्दल ५.३९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
रिझर्व्ह बँकेला पेमेंट बँकांना परवाना देण्यासाठी, बँकांमधील सायबर सुरक्षा फ्रेमवर्क आणि युपीआय इकोसिस्टमसह मोबाइल बँकिंग अॅप्स सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांशी संबंधित काही तरतुदींचे पालन केलं नसल्याचं आढळलं आहे. निवेदनानुसार, बँकेच्या KYC/AML (अँटी मनी लाँडरिंग) दृष्टीकोनातून विशेष तपासणी करण्यात आली आणि आरबीआयद्वारे मान्यता असलेल्या ऑडिटर्सद्वारे व्यापक ऑडिट करण्यात आलं.
बॅलन्सच्या रेग्युलेटरी सीलिंगचं उल्लंघन
निवेदनात रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की बँकेनं पेआउट व्यवहारांचं परीक्षण केलं नाही आणि पेआउट सेवांचा लाभ घेत असलेल्या संस्थांचं जोखीम प्रोफाइलिंगही केलं नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेनं पेआउट सेवांचा लाभ घेत असलेल्या काही ग्राहकांच्या अॅडव्हान्स अकाऊंटमध्ये दिवसाच्या अखेरिस शिल्लक रकमेच्या नियामक मर्यादेचं उल्लंघन केलं असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं.
कारणे दाखवा नोटीस
यानंतर बँकेला एक कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. बँकेचं उत्तर मिळाल्यानंतर, आरबीआयनं बँकेवर आरबीआयच्या वरील सूचनांचं पालन न केल्याचा आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला आणि त्यानंतर बँकेला दंड ठोठावण्यात आला.
ग्राहकांवरही परिणाम होणार का?
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ज्या बँकांवर दंड ठोठावण्यात आलाय, त्याचं पेमेंट त्याच बँकेला करावं लागतं. यामध्ये ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही.
Paytm पेमेंट्स बँकेवर RBI ची मोठी कारवाई, ₹५.३९ कोटींचा दंड; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
जेव्हा जेव्हा एखादी बँक RBI च्या नियमांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार करते तेव्हा रिझर्व्ह बँक त्यावर दंड आकारू शकते.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:39 PM2023-10-13T13:39:45+5:302023-10-13T13:40:43+5:30