Lokmat Money >बँकिंग > असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..."

असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..."

असुरक्षित कर्जावर कारवाई न केल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी व्यक्त केलं. पाहा का म्हणाले दास असं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:21 PM2024-06-20T14:21:22+5:302024-06-20T14:23:54+5:30

असुरक्षित कर्जावर कारवाई न केल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी व्यक्त केलं. पाहा का म्हणाले दास असं.

biz-rbi-governor-shaktikanta-das-said-unsecured-lending-growth-reduced-after-rbi-actions-know-details | असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..."

असुक्षित कर्जावर RBI गव्हर्नरांचं मोठं विधान; म्हणाले, "कारवाई केली नसती तर..."

RBI Shaktikanta Das : असुरक्षित कर्जावर कारवाई न केल्यास मोठी समस्या निर्माण झाली असती, असं मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी व्यक्त केलं. रिझर्व्ह बँकेनं अशा घडामोडींवर केलेल्या कारवाईचा अपेक्षित परिणाम असुरक्षित कर्जाची वाढ मंदावण्यावर झाल्याचंही ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या कॉलेज ऑफ सुपरवायझर्स येथे वित्तीय मजबुतीवर आंतरराष्ट्रीय परिषदेला दास यांनी संबोधित केलं. "असुरक्षित कर्जावरील बंदी हा असुरक्षित कर्जांमध्ये वाढ झाल्यामुळे या बाजारात संभाव्य समस्या उद्भवू शकते, या दृष्टिकोनाचा परिणाम आहे," असं दास म्हणाले.
 

या समस्येपासून बचाव करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं असुरक्षित कर्जावर कारवाई केली होती. आता रिझर्व्ह बँकेच्या कारवाईचा परिणाम दिसून येत आहे. लोन मार्केटमध्ये असुक्षित लोन कमी झाली आहेत. लोन मार्केट मध्ये जर एका प्रकारच्या लोनमध्ये वाढ दिसून आली, तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते.
 

कारवाईचा कसा झाला परिणाम?
 

आरबीआयच्या कारवाईच्या परिणामाबाबत बोलताना तो अतिशय उत्तम असल्याचं दास म्हणाले. "जर आम्ही आधी लक्ष दिलं नसतं तर ही एक मोठी समस्या बनली असती. अशा परिस्थितीत असुरक्षित कर्ज कमी करण्यासाठी पावलं उचलणं आवश्यक आहे, जेणेकरून कर्जाची वाढ मंदावता येईल," असं दास यांनी नमूद केलं. "आरबीआयच्या कारवाईनंतर क्रेडिट कार्ड पोर्टफोलिओ ३० टक्क्यांवरून २३ टक्क्यांवर आला आहे. तर बिगर बँक वित्त कंपन्यांची (एनबीएफसी) कर्जवाढ २९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आली आहे," असं त्यांनी नमूद केलं.
 

गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर २०२३ रोजी आरबीआयनं असुरक्षित कर्जे आणि एनबीएफसीमधील गुंतवणुकीवरील रिस्क वेट वाढवलं होतं. याशिवाय बँकेला असे असेट्स वेगळी ठेवावी लागेल, असे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले होते.

Web Title: biz-rbi-governor-shaktikanta-das-said-unsecured-lending-growth-reduced-after-rbi-actions-know-details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.