Lokmat Money >बँकिंग > 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेयसीला द्यायचंय सरप्राईज गिफ्ट? पण खिसा आहे रिकामा? इथे मिळतील झटपट पैसे

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेयसीला द्यायचंय सरप्राईज गिफ्ट? पण खिसा आहे रिकामा? इथे मिळतील झटपट पैसे

valentines day : व्हॅलेंटाईन डेला खास भेटवस्तू देण्यासाठी झटपट वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय असू शकतो. डायमंड ज्वेलरी, रोमँटिक ट्रिप, आयफोन, लक्झरी बॅग सारख्या भेटवस्तू देऊन तुम्ही प्रेयसीला सरप्राईज देऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 10:29 IST2025-02-04T10:28:47+5:302025-02-04T10:29:31+5:30

valentines day : व्हॅलेंटाईन डेला खास भेटवस्तू देण्यासाठी झटपट वैयक्तिक कर्ज हा एक चांगला पर्याय असू शकतो. डायमंड ज्वेलरी, रोमँटिक ट्रिप, आयफोन, लक्झरी बॅग सारख्या भेटवस्तू देऊन तुम्ही प्रेयसीला सरप्राईज देऊ शकता.

buy gift for your partner this valentines day without tension take instant personal loan | 'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेयसीला द्यायचंय सरप्राईज गिफ्ट? पण खिसा आहे रिकामा? इथे मिळतील झटपट पैसे

'व्हॅलेंटाईन डे'ला प्रेयसीला द्यायचंय सरप्राईज गिफ्ट? पण खिसा आहे रिकामा? इथे मिळतील झटपट पैसे

valentines day : प्रेमाचा आठवडा सुरू झाला असून बाजारपेठा वेगवेगळ्या भेटवस्तूंनी फुलल्या आहेत. या सप्ताहात लोक आपल्या जोडीदाराविषयी असलेलं प्रेम व्यक्त करतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हालाही तुमच्या जोडीदाराला काहीतरी खास गिफ्ट द्यायची इच्छा आहे. पण, खिसा रिकामा असल्याने टेन्शन आलंय? अशा परिस्थितीत झटपट वैयक्तिक कर्ज हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आजकाल, अनेक बँका आणि फिनटेक प्लॅटफॉर्म काही मिनिटांत कर्ज मंजूर करतात. जेणेकरुन आर्थिक आणीबाणीत मदत होईल.

तुम्हाला गळ्यातलं पेडंट खरेदी करायचं असेल, सरप्राईट ट्रिपचा प्लॅन डोक्यात आहे किंवा आयफोन गिफ्ट देण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत इन्स्टंट पर्सनल लोन तुमची गरज भागवू शकते. योग्य कर्जाचा पर्याय निवडून, तुम्ही सुलभ ईएमआयमध्ये परतफेड करू शकता, ज्याचा तुमच्या सध्याच्या आर्थिक नियोजनावर फारसा परिणाम होणार नाही.

आजकाल डिजिटल कर्ज प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. कुठल्याही बँकेत प्रत्यक्ष जाण्याची गरज नाही. घरबसल्या मोबाईलवरुन तुम्ही कर्ज मिळवू शकता.

झटपट वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये

  • किमान कागदपत्र : आधार कार्ड, पॅन कार्ड आणि उत्पन्नाचा पुरावा देऊन काही मिनिटांत कर्ज मंजूर केले जाते.
  • झटपट पैसे : ऑनलाइन कर्ज अर्जाद्वारे २४ तासांच्या आत कर्जाची रक्कम उपलब्ध होते.
  • परतफेडीसाठी लवचिक पर्याय : अनेक फिनटेक कंपन्या सुलभ EMI पर्याय ऑफर करतात, ज्यामुळे परतफेड सुलभ होते.
  •  

व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीला काय गिफ्ट कराल?


डायमंड ज्वेलरी किंवा घड्याळ
तुम्हाला तुमच्या जोडीदाराला एखादी अविस्मरणीय भेटवस्तू द्यायची असेल, तर डायमंडची अंगठी, नेकलेस किंवा ब्रँडेड घड्याळ हा उत्तम पर्याय असू शकतो.


सरप्राईज ट्रीप
प्रेयसीला खुश करायचं असेल तर सरप्राईज ट्रीप हा उत्तम पर्याय आहे. शहराच्या जवळ किंवा शहराच्या दूर निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता.

आयफोन
तरुणांमध्ये आयफोनची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. आयफोन आवडत नाही, अशी व्यक्ती दुर्मिळच म्हणावी लागेल. आजकाल आयफोन स्टेटस सिम्बॉल झाला आहे. अशात तुम्ही जर आयफोन गिफ्ट केला तर प्रेयसी आनंदाने उड्या मारेल.

लक्झरी बॅग 
मुलींना वेगवेगळ्या लक्झरी बॅग घेण्याची भारी हौस असते. या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही ही हौस पुरी करू शकता.

प्रीमियम स्पा आणि वेलनेस पॅकेज
सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर विश्रांती प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला आरामदायी भेटवस्तू द्यायची असेल, तर उच्च श्रेणीचे स्पा पॅकेज, वेलनेस रिट्रीट किंवा फिटनेस मेंबरशिप हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो.
 

Web Title: buy gift for your partner this valentines day without tension take instant personal loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.