Loan Recovery: जर तुम्हीही तुमच्या गरजा भागवण्यासाठी कर्ज घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पर्सनल लोन घेण्यासाठी जास्त कागदपत्रांची गरज नसते. काही मूलभूत कागदपत्रांच्या माध्यमातून बँका किंवा वित्तीय संस्था तुमचं क्रेडिट पाहून तुम्हाला कर्ज देतात. परंतु, जर काही कारणास्तव तुम्ही कर्जाची परतफेड करू शकत नसाल किंवा त्याचा ईएमआय वेळेत भरू शकत नसाल तर तुम्हाला रिकव्हरी एजंटचा सामना करावा लागतो. अनेकदा वसुली एजंट कर्ज न भरलेल्या लोकांना चुकीची वागणूक देत असल्याच्या बातम्या येतात. रिकव्हरी करण्यासाठी कोणते कायदे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुया. कर्जाची वसूली करण्यासाठी एजंट आपल्या घरी येऊ शकतो का?
पर्सनल लोन घेताना त्यावर ठराविक व्याज भरावं लागतं आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही कारणास्तव कर्जाची परतफेड करत नाही, तेव्हा रिकव्हरी एजंट तुम्हाला कर्जाची रक्कम फेडण्यास सांगतो. आरबीआयनं रिकव्हरी एजंटसाठी नियम बनवले आहेत, कर्जाशी संबंधित कोणत्याही ग्राहकाशी कधी बोलावं, या सर्वांसाठी नियम आहेत.
रिकव्हरी एजंट आपल्या घरी येऊ शकतात का?
आता प्रश्न असा आहे की, कर्ज फेडले नाही तर वसुली एजंट तुमच्या घरी येऊन कर्ज मागू शकतात का, तर त्याचं उत्तर होय असं आहे. रिकव्हरी एजंट आपल्या घरी येऊ शकतात. पण त्यासाठीही काही नियम आहेत. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, रिकव्हरी एजंट कोणत्याही ग्राहकाच्या घरी किंवा कामाच्या ठिकाणी विशिष्ट वेळेत जाऊ शकत नाही. याशिवाय त्यांना कर्ज घेतलेल्यांशी बोलून आणि लोन फेडण्याच्या पद्धतींबाबत सोप्या पद्धतीनं लोकांना समजवावं लागतं.
रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोणताही रिकव्हरी एजंट कर्जदारावर जबरदस्ती किंवा भीतीदायक पद्धतींचा वापर करू शकत नाही, तसंच जीवे मारण्याची धमकी आणि अयोग्य भाषेसह मानसिक दबावाचा देखील वापरू शकत नाही.