सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने सर्व प्रकारच्या डेबिट कार्डवरील सेवा शुल्कात वाढ केली आहे. बँकेच्या अधिसूचनेनुसार, नवीन सेवा शुल्क १३ फेब्रुवारीपासून लागू होईल. बँकेने ॲन्युअल फी, कार्ड रिप्लेसमेंट, डेबिट कार्ड इनॅक्टिव्हिटी चार्जेस आणि एसएमएस चार्जेसमध्ये अलर्ट शुल्क यावरील सेवा शुल्कात वाढ केली आहे. वरील सेवा शुल्कामध्ये कर समाविष्ट नसून ते यावर लागू केले जातील. कॅनरा बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, सुधारित सेवा शुल्क १३ फेब्रुवारीपासून लागू होईल.
क्लासिक किंवा स्टँडर्ड डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 125 रुपयांवरून 200 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. प्लॅटिनम कार्डसाठी वार्षिक शुल्क 250 रुपयांवरून 500 रुपये आणि बिझनेस कार्डसाठी वार्षिक शुल्क 300 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आले आहे. कॅनरा बँक निवडक डेबिट कार्डांसाठी 1000 रुपये वार्षिक शुल्क आकारत राहणार आहे.
डेबिट कार्ड बदलण्याचे शुल्क
क्लासिक किंवा स्टँडर्ड डेबिट कार्डसाठी, कॅनरा बँकेने डेबिट कार्ड रिप्लेसमेंट शुल्क शून्यावरून 150 रुपये केले आहे. कॅनरा बँकेने प्लॅटिनम, बिझनेस आणि निवडक कार्ड्ससाठी शुल्क 50 रुपयांवरून 150 रुपये केले आहे. फक्त बिझनेस डेबिट कार्ड ग्राहकांसाठी, बँक आता कार्ड इनएक्टिव्हिटी चार्ज 300 रुपये प्रतिवर्ष आकारेल. इतर कोणत्याही प्रकारच्या कार्डवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
एसएमएस अलर्ट चार्जकॅनरा बँक आता ॲक्चुअल बेसिसवर एसएमएस अलर्ट शुल्क आकारेल जे आधी आकारण्यात आलेल्या प्रति तिमाही 15 रुपयांपासून सुरू होईल. कॅनरा बँक डेबिट कार्ड - स्टँडर्ड/क्लासिकसाठी, एटीएममधून दररोज रोख पैसे काढण्याची मर्यादा 40,000 रुपये आहे. प्लॅटिनम/सिलेक्टसाठी दैनंदिन रोख पैसे काढण्याची मर्यादा 50,000 रुपये आणि दैनंदिन खरेदी व्यवहार मर्यादा 2 लाख रुपये आहे.