Join us  

Car Loan: नवरात्रीपर्यंत कार घेण्याचा आहे का प्लॅन? चेक करा १० लाखांपर्यंतच्या लोनवर किती द्यावा लागेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 1:38 PM

Car Loan Interest Rate 2024:  तुम्हीही नवरात्रीपर्यंत कार लोन घेऊन तुमच्या स्वप्नातली कार घेण्याचा विचार करत आहात का? तुम्ही बँकांचे व्याजदरही तपासत आहात? तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

Car Loan Interest Rate 2024:  तुम्हीही नवरात्रीपर्यंत कार लोन घेऊन तुमच्या स्वप्नातली कार घेण्याचा विचार करत आहात का? तुम्ही बँकांचे व्याजदरही तपासत आहात? कार लोनवर बँकेकडून दिला जाणारा सर्वात कमी व्याजदर कोणता आहे, तसंच १० लाख रुपयांच्या कार लोनवर तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल याची सविस्तर माहिती येथे जाणून घेऊ.

युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India): सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या युनियन बँक ऑफ इंडिया १० लाख रुपयांच्या नवीन कार लोनवर ८.७० टक्के व्याज आकारत आहे. हे कर्ज चार वर्षांसाठी असून त्यावर तुमचा ईएमआय २४,५६५ रुपये असू शकतो.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) : देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय ८.७५% व्याजदरानं कार लोन देत आहे. यामध्ये तुमचा मासिक ईएमआय २४,५८७ रुपये असेल. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इंडियन बँकही याच व्याजदरानं कार लोन देत आहेत.

बँक ऑफ इंडिया (Bank Of India): बँक ऑफ इंडिया ८.८५ टक्के व्याजदरानं कार लोन देत आहे. यावर तुम्हाला दरमहा २४,६३२ रुपयांचा ईएमआय भरावा लागेल.

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) : बँक ऑफ बडोदा चार वर्षांसाठी ८.९० टक्के व्याजदरानं कार लोन देत आहे. यामध्ये तुमचा ईएमआय २४,६५५ रुपये असेल.

आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) : आयसीआयसीआय बँक ९.१० टक्के व्याजदरानं चार वर्षांसाठी १० लाख रुपयांचे कार लोन देत आहे. यामध्ये तुमचा मासिक ईएमआय २४,७४५ रुपये असेल.

अॅक्सिस बँक (Axis Bank) : अॅक्सिस बँक ९.३० टक्के व्याजदरानं कार लोन देत आहे. या कर्जाचा ईएमआय २४,८३५ रुपये असेल.

एचडीएफसी बँक (HDFC Bank) : एचडीएफसी बँक ९.४० टक्के व्याजदरानx १० लाख रुपयांचं कार लोन देत आहे. यावर तुम्हाला २४,८८१ रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारांपूर्वी बँकांकडून योग्य ती माहिती घेणं आवश्यक आहे. या व्याजदरांमध्ये बँकांनुसार बदल असू शकतो.)

टॅग्स :कारबँक