Join us  

बदलले UPI शी निगडित नियम, ट्रान्झॅक्शन लिमिट वाढलं; मिळणार ऑफलाइन पेमेंटची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 1:40 PM

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत युपीआयशी संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या (RBI MPC Meeting) बैठकीत युपीआयशी (UPI) संबंधित मोठे निर्णयही घेण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आपल्या निवेदनात याबाबत माहिती दिली. रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाईट (UPI Lite) वरील ट्रान्झॅक्शन लिमिट  (UPI Lite Transaction limit) वाढवलं आहे.

त्याचबरोबर लवकरच ऑफलाइन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी युपीआय पेमेंट वाढवण्यासाठी अनेक उपाय जाहीर केले आहेत. यामध्ये युपीआय लाईट (UPI Lite) वरील ट्रान्झॅक्शन लिमिट २०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवणे समाविष्ट आहे. लवकरच यूपीआयच्या माध्यमातून ऑफलाइन पेमेंटची सुविधाही आणली जाईल, असंही दास यांनी सांगितलं. यासोबतच युपीआय प्लॅटफॉर्मवर कन्व्हर्सेशनल पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. नियर फिल्ड कम्युनिकेशनद्वारे ऑफलाइन पेमेंट करता येणार आहे. याअंतर्गत युपीआय लाईटमधून ५० रुपयांपर्यंतचं पेमेंट करता येईल.

वाढलं लिमिटअशाप्रकारे, रिझर्व्ह बँकेच्या या पतधोरण समितीच्या बैठकीत युपीआयशी संबंधित तीन घोषणा झाल्या आहेत. प्रथम, कन्व्हर्शेनल पेमेंटची सुविधा युपीआयवर सुरू केली जाईल. युपीआयवर ऑफलाइन पेमेंटची सुविधा असेल. तिसरी घोषणा म्हणजे युपीआय लाईटवरील ट्रान्झॅक्शन लिमिट २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे.

परकीय चलन साठा ६०० अब्ज डॉलर्स पारभारतीय रुपया जानेवारी २०२३ पासून स्थिर आहे. भारताच्या परकीय चलनाचा साठा ६०० अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला असल्याची माहिती दास यांनी दिली.

रेपो रेट 'जैसे थे'सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महागाईसोबत सुरू असलेल्या लढाईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल, ईएमआय तेवढाच राहिल का त्यामध्ये कोणते बदल होतील याकडे सर्वांचं लक्ष लागू होतं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल न केल्याची माहिती दिली. त्यामुळे ईएमआयही वाढणार नाहीये.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दासऑनलाइनपैसा