सणासुदीच्या काळात सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्या आहेत. या मालिकेत पंजाब नॅशनल बँकेनx (PNB) 'दिवाळी धमाका 2023' नावाची नवीन ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, PNB ग्राहकांना वार्षिक 8.4 टक्के व्याजदरानं गृहकर्ज मिळू शकते. त्याचप्रमाणे, बँक ऑफ बडोदा (BoB) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी देखील गृहकर्जासह अन्य ऑफर्स आणल्या आहेत. पाहूया बँकांच्या दिवाळी ऑफर्सबद्दल.पंजाब नॅशनल बँकपंजाब नॅशनल बँकेचं ग्राहक 8.75% पासून सुरू होणाऱ्या व्याजदरानं वाहन कर्ज घेऊ शकतात. याशिवाय, ग्राहकांना प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस पूर्णपणे माफ असतील. पीएनबीकडून गृहकर्ज घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी व्याजदर 8.4 टक्क्यांपासून सुरू होतात. या प्रकारच्या कर्जावर बँक कोणतीही प्रोसेसिंग फी आणि डॉक्युमेंटेशन चार्जेस आकारणार नाही. गृहकर्जासाठी पीएनबीच्या https://digihome.pnb.co.in/pnb/hl/ वेबसाइटवर अर्ज करता येईल.याशिवाय तुम्ही पीएनबी वन अॅप वापरू शकता. अतिरिक्त माहितीसाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 1800 1800/1800 2021 वर कॉल करू शकता किंवा PNB शाखेला भेट देऊ शकता.
स्टेट बँकेची ऑफरसणासुदीचा काळ लक्षात घेऊन, एसबीआय 1 सप्टेंबर 2023 पासून आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर राबवत आहे. या ऑफरची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2023 आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत, एसबीआय ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट ब्युरो स्कोअरच्या आधारे टर्म लोन दिलं जात आहे. क्रेडिट स्कोअर जितका जास्त असेल तितक्या जास्त सवलती व्याजदरात दिल्या जातील. उच्च क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना 65 बेसिस पॉइंट पर्यंत व्याजदरात सवलत दिली जाईल.बँक ऑफ बडोदाबँक ऑफ बडोदानं फिलिंग ऑफ फेस्टिव्हल विथ बीओबी सुरू केलंय. या अंतर्गत होम लोनचे व्याजदर 8.4 टक्क्यांपासून सुरू होत आहेत. याशिवाय यावर कोणतंही प्रोसेसिंग शुल्क आकारलं जात नाही. याशिवाय 8.7 टक्के व्याजदरानं कार लोनदेखील ऑफर केलं जात आहे.