Join us  

ATM Transaction Limit: एटीएममधून पैसे काढणं मोफत नाही, मर्यादेपेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन्सवर आकारले जातात इतके रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 4:51 PM

HDFC-SBI-ICICI-Axis Bank ATM Limit: आपल्या बँकांच्या एटीएममधून ठराविक मोफत व्यवहारांची परवानगी देण्यात आली आहे.

HDFC-SBI-ICICI-Axis Bank ATM Limit: देशातील सर्व मोठ्या बँका मग खाजगी असोत किंवा सरकारी, त्या प्रत्येक महिन्याला एका निश्चित मर्यादेपर्यंत मोफत एटीएम व्यवहाराची परवानगी देतात. मोफत व्यवहारानंतर बँका ग्राहकांकडून शुल्क आकारतात. तुमच्‍यातकडे कोणत्याप्रकारचं कार्ड आहे आणि खातं आहे, यावर तुम्हाला एटीएममधून किती मोफत व्यवहारांची परवानगी आहे हे अवलंबून असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना १ जानेवारी २०२२ पासून मासिक मोफत व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार झाल्यास त्यांना प्रति व्यवहार २१ रुपये आकारण्याची परवानगी होती. यापूर्वी अशा व्यवहारांसाठी बँका २० रुपये आकारत असत.

आपल्या बँकांच्या एटीएममधून पाच मोफत व्यवहारांची परवानगी देण्यात आली आहे. तर अन्य बँकांच्या एटीएममधून तुम्ही तीन वेळा व्यवहार करू शकता. रिझर्व्ह बँकेनं बँकांना १ ऑगस्ट २०२२ पासून सर्व केंद्रांवर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी १७ रुपये आणि प्रत्येक गैर-आर्थिक व्यवहारासाठी ६ रुपये इंटरचेंज शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. एटीएमच्या इन्स्टॉलेशनचा आणि देखभालीचा खर्च वसूल करण्यासाठी बँका एटीएम सेवा शुल्क देखील आकारतात.

पाहुया बँका किती एटीएम शुल्क घेतात

स्टेट बँक

दुसऱ्या बँकेच्या ग्राहकाने मर्यादेनंतर एसबीआय एटीएममधून त्याच्या डेबिट कार्डमधून पैसे काढल्यास, स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ल्कार्डधारकाकडून २० रुपये + GST ​​आणि आपल्या बँकेतील ग्राहकाकडून १० रूपये + GST ​​आकारेल. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी, SBI इतर बँक ग्राहकांकडून ८ रूपये + GST ​​आणि स्टेट बँकेच्या खातेधारकांकडून ५ रूपये GST ​​आकारेल. खात्यात पुरेशी रक्कम नसल्यास, एसबीआय बँकेच्या एटीएम आणि इतर बँकांच्या एटीएमवर ग्राहकांकडून २० रुपये + GST आकारले जाईल.

आयसीआयसीआय बँक

अन्य बँकांच्या ग्राहकांना आयसीआयसीआयच्या एटीएममधून एकावेळी पैसे काढण्याची मर्यादा १० हजार रूपये आहे. आरबीआयनं ५ वेळा मोफत व्यवहाराची सुविधा दिली आहे. तसंच मर्यादेनंतर ग्राहकांना पैसे काढायचे असल्यास २१ रूपये अधिक जीएसटी आणि गैर आर्थिक व्यवहारांसाठी ८.५० रूपये शुल्क द्यावं लागेल.

एचडीएफसी बँक

जर इतर बँकांच्या ग्राहकांनी एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून डेबिट कार्डने पैसे काढले तर ते एकावेळी १० हजार रुपये काढू शकतील. सॅलरी अकाऊंट असलेल्यांना ग्राहकांना बचत खातेधारकांसह ५ विनामूल्य व्यवहार देखील मिळतील. तुम्ही एचडीएफसी बँकेतून विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास बँक तुमच्याकडून आर्थिक व्यवहारांसाठी २१ रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी ८.५० रुपये + जीएसटी आकारेल.

अॅक्सिस बँकजर तुम्ही अॅक्सिस बँकेच्या एटीएममधून दुसऱ्या बँकेचं डेबिट कार्ड वापरून पैसे काढत असाल तर यासाठी तुम्हाला १० हजार रूपयांची मर्यादा आहे. मर्यादेपेक्षा अधिक व्यवहार केल्यास ग्राहकांकडून २० रूपयांचे शुल्क आकारले जाते.

टॅग्स :बँकएटीएमपैसा