Join us

चीनचे बडे बडे अधिकारी बेपत्ता होऊ लागले; रिअल इस्टेट क्षेत्राने बँकांनाही कवेत घेतले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 4:05 PM

तीन ट्रिलियन डॉलर्सचे शॅडो बँक सेक्टर बु़डाले आहे. Zhongzhi ने रिअल इस्टेट क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. आता तिथून त्यांना पैसे परत मिळणे मुश्किल बनले आहे. 

चीनमधील रिअल इस्टेट संकटाने आता कंपन्यांच्या मालकांबरोबर बँकांच्या अधिकाऱ्यांनाही गायब करायला सुरुवात केली आहे. बँकिंग सेक्टर आता डगमगू लागले आहे. चीनची सर्वात मोठी वेल्थ मॅनेजमेंट कंपनी झोंगझीने गेल्या आठवड्यात पूर्ण पैसे चुकते करण्याच्या परिस्थितीत नसल्याचे जाहीर केले आहे. यानंतर या ग्रुपशी संबंधीत कंपन्यांचे अनेक अधिकारी बेपत्ता होऊ लागले आहेत. 

चीनचे रिअल इस्टेट क्षेत्र डुबू लागले आहे. चीनच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा २५ टक्के वाटा आहे. या कंपन्यांना बँकांनी वारेमाप पैसा पुरविला आहे. यामुळे चीनची संपूर्ण अर्थव्यवस्थाच बुडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हळू हळू दुसऱ्या सेक्टर्सनाही आपल्या कवेत घेण्यास सुरुवात केली आहे. तीन ट्रिलियन डॉलर्सचे शॅडो बँक सेक्टर बु़डाले आहे. Zhongzhi ने रिअल इस्टेट क्षेत्रात खूप मोठी गुंतवणूक केली आहे. आता तिथून त्यांना पैसे परत मिळणे मुश्किल बनले आहे. 

झोंगझी ग्रुप ही चीनमधील सर्वात मोठ्या खाजगी कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा व्यवसाय व्यवसाय आर्थिक सेवा, खाणकाम आणि इलेक्ट्रिक वाहने या क्षेत्रात आहे. या ग्रुपचr शैक्षणिक फर्म डेलियन माय जिम एज्युकेशन टेक्नॉलॉजीच्या अध्यक्षा मा होंगयिंग बेपत्ता आहेत. शिनजियांग तियानशान पशुसंवर्धन जैव अभियांत्रिकीचे अध्यक्ष मा चेंगशुई हे देखील बेपत्ता आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघे झोंगझीसाठी कार्यरत आहेत. चेंगशुई हे झोंगझीचे उपाध्यक्ष देखील होते. 

कंपनीवर 460 अब्ज युआन एवढे देणे आहे. परंतू, कंपनीकडे फक्त २०० अब्ज युआन एवढीच संपत्ती आहे. बऱ्याच काळापासून कर्ज आणि इक्विटी गुंतवणुकीत पैसा अडकला आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना देशाच्या अर्थव्यवस्थेवर सरकारची पकड मजबूत करायची आहे. यासाठी खासगी कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. तंत्रज्ञान, वित्त आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील डझनहून अधिक अधिकारी बेपत्ता आहेत किंवा ते कोठडीत आहेत किंवा त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराची प्रकरणे प्रलंबित आहेत. 

टॅग्स :चीनबांधकाम उद्योग