CIBIL Score And Credit Score : अनेकदा कर्ज देताना बँक किंवा कोणतीही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर तपासते. अशा स्थितीत तुम्ही क्रेडिट स्कोअर आणि सिबिल स्कोअर हे शब्द ऐकलेच असतील. खरं तर, ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड पूर्वी क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (CIBIL) म्हणून ओळखली जात होती. ही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे. याशिवाय एक्सपीरियन, सीआरआयएफ हाय मार्क आणि इक्विफॅक्स या तीन क्रेडिट रेटिंग एजन्सीही आहेत. त्याच वेळी, क्रेडिट स्कोअर एक महत्त्वपूर्ण मेट्रिक आहे, जो कर्जदाराच्या कर्ज घेण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठी वापरला जातो.
सिबिल स्कोअर, क्रेडिट स्कोअर मधील फरक?
सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, सिबिल स्कोअर आणि क्रेडिट स्कोअर मधील मुख्य फरक असा आहे की सिबिल स्कोअर देशातील सिबिल क्रेडिट ब्युरोद्वारे जारी केला जातो, तर क्रेडिट स्कोअरचा वापर केवळ एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक क्षमतेचं मूल्यांकन करण्यासाठी केला जातो. हा बऱ्याच क्रेडिट ब्युरोद्वारे निर्धारित केला जाऊ शकतो. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० पर्यंत असतो आणि त्यामध्ये व्यक्तीचा क्रेडिट हिस्ट्री, कर्ज आणि परतफेडीची माहिती समाविष्ट असते.
सिबिल स्कोअर कसा ठरवतात?
सिबिल स्कोअर कर्जदाराच्या क्रेडिट हिस्ट्रीला तीन अंकी संख्येत सांगतो आणि त्या व्यक्तीची क्रेडिट प्रोफाइल रिफ्लेक्ट करतो. सिबिल स्कोअर ३०० ते ९०० अंकांच्या दरम्यान असतो. एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर जितका जास्त असेल तितका तो चांगला मानला जातो आणि क्रेडिट कार्ड किंवा कर्ज मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. ७५० पेक्षा जास्त स्कोअर हा एक चांगला सिबिल स्कोअर आहे आणि बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांना आपल्या कर्जाच्या अर्जाचं मूल्यांकन आणि ते पास करण्यास मदत करते.