Join us

Closing Bell: सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स आपटला, ३६६ अकांची घसरण; निफ्टीही १९४५०च्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 4:38 PM

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्णयांचा परिणाम शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीच्या रूपात दिसून आला.

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या निर्णयांचा परिणाम शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीच्या रूपात दिसून आला. शुक्रवारी कामकाजाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बाजार सुस्तीने उघडला आणि अखेरच्या सत्रात घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स सलग दुसऱ्या दिवशी 366 अंकांनी घसरला, तर निफ्टी 19450 च्या खाली बंद झाला. इंडियन ओव्हरसीज बँकेचे शेअर्स 14 टक्क्यांनी वधारले. तर अपोलो टायरचे शेअर्स 8 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी घसरून 82.87 वर बंद झाला.

शुक्रवारी 30 शेअर्सचा सेन्सेक्स 365.53 अंकांनी म्हणजेच 0.56 टक्क्यांनी घसरून 65,322.65 वर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 114.80 अंकांनी म्हणजेच 0.59 टक्क्यांनी घसरून 19,428.30 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, निफ्टी फार्मा निर्देशांकातही घसरण झाली.

कोणत्या शेअर्समध्ये वाढइंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. यामध्ये 13.36 टक्क्यांनी वाढ होऊन ती 30.55 रुपयांवर बंद झाला. तर आनंद राठी वेल्थचे शेअर्स 10.33 टक्क्यांनी, जीएमएम फोडलर 9.67 टक्क्यांनी आणि हिंदुस्थान कॉपरचे शेअर 7.22 टक्क्यांनी वाढून 158 रुपयांच्या वर गेले. सेन्सेक्समधील 30 शेअर्समधील 8 शेअर्समध्ये वाढ झाली. यात एचसीएल टेक, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टायटन आणि टीसीएस यांचा समावेश आहे. 

कोणते शेअर्स घसरलेसर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये अपोलो टायर्सचा शेअर होता. यामध्ये 8.27 टक्क्यांनी घसरण होऊन तो 395.85 रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे अल्केम लॅबचा शेअर 7.71 टक्क्यांनी घसरला. अशोका, AKI इंडियाच्याही शेअर्समध्ये घसरण झाली. व्ही-मार्ट, आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल, झायडस आणि आयटीसीच्या शेअर्समध्येही घसरण झाली.

टॅग्स :शेअर बाजार