Lokmat Money >बँकिंग > UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा

UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा

पाहा काय आहे ही सुविधा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 02:04 PM2022-10-03T14:04:35+5:302022-10-03T14:05:08+5:30

पाहा काय आहे ही सुविधा...

Cred launches Scan & Pay feature as it enters offline payments space know details online payment | UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा

UPI द्वारे पमेंट करा आणि मिळवा दुप्पट कॅशबॅक, CRED ने सुरू केली नवी सुविधा

आता ग्राहकांना स्कॅन करून आणि युनिफाईड पेमेंट्स (Unified Payments Interface) म्हणजेच युपीआय ट्रान्झॅक्शनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रेडिट कार्ड पेमेंट प्लॅटफॉर्म क्रेडने (CRED) दिली आहे. क्रेडमध्ये टायगर ग्लोबल आणि काल्कॉन एज कॅपिटल यांची गुंतवणूक आहे. ग्राहकांना ब्रँड्सवर डील्स आणि ट्रान्झॅक्शनवर कॅशबॅक आणि सोबतच पार्टनर मर्चंट्सना करण्यात येणाऱ्या पेमेंटवर दुप्पट रिवॉर्ड देण्यात येतील, असंही कंपनीनं म्हटलंय.

हे कॅशबॅक ग्राहकांच्या बँक खात्यात दिले जाणार नाहीत, तर त्याच्या क्रेडिट बॅलन्समध्ये जोडले जातील. हे रिवॉर्ड्स CRED कॉईन्स किंवा CRED जेम्सच्या स्वरूपात दिली जातील. यामुळे क्रेडचे अॅप-मधील व्यवहार वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. क्रेड युझर्सची विश्वासार्हता लक्षात घेत हे विकसित करण्यात आल्याचं क्रेडचे फाऊंडर कुणाल शाह यांनी सांगितलं.  

पेमेंटदरम्यान प्रायव्हसी
याद्वारे युझर्सना मोबाइल नंबर सारख्या वैयक्तिक माहितीद्वारे युपीआय आयडी तयार करम्याची संधी मिळेल. याने पेमेंटदरम्यान प्रायव्हसीची काळजी घेतली जाईल. एकदा कस्टम व्हर्च्युअल पेमेंट अॅडरेस अॅक्टिव्ह झाल्यानंतर युपीआय आयद्वारे पेमेंट केले जाऊ शकतील, असं क्रेडनं सांगितलं. क्रेडच्या अन्य सुविधांप्रमाणे युपीआयद्वारे स्कॅन आणि पे ही सुविधा 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोअर असलेल्यांना उपलब्ध होतील.

Web Title: Cred launches Scan & Pay feature as it enters offline payments space know details online payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.