Lokmat Money >बँकिंग > क्रेडिट कार्डाचा वापर बँकांसाठी ठरतोय डोकेदुखी; थकबाकी ५०० टक्क्यांवर, प्रकरण काय

क्रेडिट कार्डाचा वापर बँकांसाठी ठरतोय डोकेदुखी; थकबाकी ५०० टक्क्यांवर, प्रकरण काय

क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआय आकडेवारीनुसार, एनपीए म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:27 IST2025-04-11T15:25:57+5:302025-04-11T15:27:41+5:30

क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआय आकडेवारीनुसार, एनपीए म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Credit card usage is becoming a headache for banks outstanding balances are at 500 percent what is the matter | क्रेडिट कार्डाचा वापर बँकांसाठी ठरतोय डोकेदुखी; थकबाकी ५०० टक्क्यांवर, प्रकरण काय

क्रेडिट कार्डाचा वापर बँकांसाठी ठरतोय डोकेदुखी; थकबाकी ५०० टक्क्यांवर, प्रकरण काय

क्रेडिट कार्डचा वाढता वापर बँकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. आरबीआय आकडेवारीनुसार, एनपीए म्हणजेच क्रेडिट कार्ड ग्राहकांकडून डिफॉल्ट केलेली रक्कम डिसेंबर २०२४ मध्ये २८.४२% नं वाढली आहे. क्रेडिट कार्ड एनपीए ६७४२ कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. तो २०२३ मध्ये ५२५० कोटी रुपये होता. डिसेंबर २०२० पर्यंत क्रेडिट कार्ड कार्डचा एकूण एनपीए ११०८ कोटी रुपये होता. तो ४ वर्षांत ५०० टक्क्यांनी वाढून ६७४२ कोटी रुपये झाला आहे. हा आकडा २.९२ लाख कोटी रुपयांच्या थकीत कर्जाच्या २.३% आहे.

लोक होताहेत कंगाल

क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या भोवऱ्यात अडकून लोक कंगाल होत जातात. जेव्हा एखादा ग्राहक त्याचे क्रेडिट कार्ड बिलिंग सायकलच्या बाहेर करतो तेव्हा बँक थकीत रकमेवर वार्षिक ४२-५०% इतके मोठे व्याज आकारतात. याशिवाय बँका दंडही आकारतात.

२.९२ लाख कोटी आऊटस्टँडिंग

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२३ मध्ये क्रेडिट कार्ड एनपीए ५,२५० कोटी रुपये होता, जो आता वाढून ६,७४२ कोटी रुपये झाला आहे. अर्थव्यवस्थेत मंदीच्या काळात ही वाढ दिसून येत आहे. डिसेंबर २०२४ मध्ये क्रेडिट कार्ड सेगमेंटची एकूण थकबाकी २.९२ लाख कोटी रुपये होती, त्यापैकी २.३% (६,७४२ कोटी) एनपीए आहे. गेल्या वर्षी २.५३ लाख कोटी रुपयांच्या थकबाकीवर हा आकडा २.०६ टक्के होता.

इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीप्रमाणे, डिसेंबर २०२० मध्ये क्रेडिट कार्डएनपीए केवळ १,१०८ कोटी रुपये होता, जो गेल्या चार वर्षांत ५०० टक्क्यांहून अधिक वाढला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे याच कालावधीत बँकांनी डिसेंबर २०२३ मधील एकूण एनपीए ५ लाख कोटी रुपये (एकूण कर्जाच्या २.५ टक्के) वरून डिसेंबर २०२४ मध्ये ४.५५ लाख कोटी रुपये (२.४१ टक्के) पर्यंत कमी केला.

पर्सनल लोनचे डिफॉल्टर वाढले

पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये डिफॉल्टमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे. ही समस्या कर्जदारांच्या कर्जाचा बोजा वाढण्याशी निगडित आहे. क्रेडिट कार्ड असुरक्षित (विनातारण ) थकित असतात आणि त्यांचे व्याजदर खूप जास्त असतात (वार्षिक ४२-४६%). बिलिंग सायकलनंतरही ग्राहकानं पैसे न भरल्यास हे खाते एनपीए बनतं. अशा परिस्थितीत ग्राहकाचा क्रेडिट स्कोअरही घसरतो.

Web Title: Credit card usage is becoming a headache for banks outstanding balances are at 500 percent what is the matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक