Join us  

Adani वर बंदी घातलेल्या बँकेचे वाजले बारा; ८ दिवसात परिस्थिती झाली बिकट, सोसावं लागलं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 7:27 PM

अदानींच्या हिंडेनबर्ग प्रकरणात ज्या आंतरराष्ट्रीय बँकेने अदानींचे बॉन्ड स्वीकारण्यास नकार दिला ती क्रेडिट सुइस बँकच होती.

अदानींच्या हिंडेनबर्ग प्रकरणात ज्या आंतरराष्ट्रीय बँकेने अदानींचे बॉन्ड स्वीकारण्यास नकार दिला ती क्रेडिट सुइस बँकच होती. या गोष्टीला आता ४७ दिवस उलटले आहेत आणि आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ज्या बँकेनं अदानींचे बॉन्ड स्वीकारण्यास नकार दिला होता आज तिच बँक देशोधडीच्या मार्गावर आहे. ज्या अदानीच्या शेअर्समध्ये घसरण व्हायला ४ आठवडे लागले, त्यातुलनेत क्रेडिट सुइसचे शेअर्स अधिक घसरले आहेत. क्रेडिट सुइसचे शेअर्स अवघ्या ८ दिवसांत ७५ टक्क्यांनी कोसळले आहेत.

सर्वोच्च पातळीच्या तुलनेत ९९ टक्के कोसळली बँकसद्यस्थिती पाहायची झाली तर जवळपास ६५ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. क्रेडिट सुईसचा स्टॉक आता आजवरच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहे आणि २००७ मधील सर्वाधिक उच्चांकाच्या तुलनेत ९९ टक्क्यांनी खाली कोसळला आहे. दुसरीकडे यूबीएसच्या शेअर्समध्येही जवळपास १६ टक्क्यांची घसरण झाली आहे.

अदानींना दोन महिन्यांत १० लाख कोटींचा तोटादुसरीकडे, २५ जानेवारी रोजी हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये संयुक्तपणे ५२ टक्के मार्केट कॅप पाहायला मिळाला आहे. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत अदानीच्या शेअर्सचे मार्केट कॅप सुमारे १० लाख कोटी रुपयांनी खाली आला होता.

क्रेडिट सुइसच्या प्रत्येक 22.48 शेअर्सच्या मोबदल्यात UBS चा 1 शेअरविलीनीकरणाच्या कराराच्या अटींनुसार, क्रेडिट सुइसच्या सर्व भागधारकांना क्रेडिट सुइसच्या प्रत्येक 22.48 शेअर्ससाठी UBS चा 1 शेअर मिळेल. क्रेडिट सुईसच्या 2022 च्या वार्षिक अहवालात आर्थिक अहवालावर अंतर्गत नियंत्रण "मटेरियल वीकनेस" ओळखल्यानंतर बँकेच्या समस्या गेल्या दोन वर्षांपासून समोर आल्या आहेत. बँकिंग क्षेत्रातील दिग्गज बँकेतून ठेवीदारांनी पैसे काढण्यास सुरुवात करताच बँकेचा शेअर कोसळू लागला.

स्विस नियामक FINMA ने सांगितले की ते अनेक महिन्यांपासून क्रेडिट सुईसचे बारकाईने निरीक्षण करत आहे. बँकेने परिस्थिती स्थिर करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. बँकेवर विश्वास निर्माण करण्यासाठी हे पुरेसे नव्हते. पण अधिक दूरगामी पर्याय देखील शोधले गेले आहेत. FINMA ने म्हटले आहे की बँक बुडीत निघण्याचा धोका आहे. 

टॅग्स :गौतम अदानी