Lokmat Money >बँकिंग > Check Bounce: तुम्हाला मिळालेला चेक बाऊन्स झाला? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

Check Bounce: तुम्हाला मिळालेला चेक बाऊन्स झाला? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

चेक देण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यातील रक्कम नक्की तपासून पाहा, अन्यथा तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:55 AM2024-01-18T11:55:47+5:302024-01-18T11:56:40+5:30

चेक देण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यातील रक्कम नक्की तपासून पाहा, अन्यथा तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

Did your check bounce Know what your rights are know details banking rules | Check Bounce: तुम्हाला मिळालेला चेक बाऊन्स झाला? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

Check Bounce: तुम्हाला मिळालेला चेक बाऊन्स झाला? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

Cheque Bounce Rules: भारतात चेक बाऊन्स हा आर्थिक गुन्हा मानला जातो. त्यामुळे चेक देण्यापूर्वी तुमच्या बँक खात्यातील रक्कम नक्की तपासून पाहा, अन्यथा तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तसंच, जर तुम्हाला कोणी दिलेला चेक बाऊन्स झाला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. जर तुम्ही एखाद्याचा चेक जमा केला आणि तो बाऊन्स झाला तर अशा परिस्थितीत तुमचे अधिकार काय असतील हे जाणून घेऊ.

कायदेशीर कारवाई

जर एखाद्याचा चेक बाऊन्स झाला तर त्याच्या नावानं कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. मग नोटीसचं उत्तर १५ दिवसांत मिळालं नाही, तर 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १८८१' च्या कलम १३८ अन्वये त्या व्यक्तीवर कारवाई कशी करता येईल. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट १८८१ च्या कलम १४८ अंतर्गत चेक बाऊन्सची केस नोंदवली जाऊ शकते.

चेक बाऊन्स होण्यावर शिक्षा

चेक बाऊन्स होणं हा एक गुन्हा मानला गेला आहे. अशा प्रकरणात चेक बाऊन्स पनिशमेंट म्हणून निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत २ वर्षाचा तुरुंगवास आणि दंड दोन्हीची तरतूद आहे. परंतु सामान्यत: न्यायालय ६ महिने किंवा १ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावतं. यामध्ये कलम १३८ अंतर्गत खटला दाखल केला जातो.

किती असतो दंड?

चेक बाऊन्स झाल्या ₹१५० ते ₹७५० किंवा ₹८०० पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. यासोबतच २ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि धनादेशात लिहिलेल्या रकमेच्या दुप्पट दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. परंतु हे अशा परिस्थितीत घडते जेव्हा चेक देणाऱ्याकडे त्याच्या खात्यात पुरेसे पैसे नसतात आणि बँक चेकला डिसऑनर करेल.

कसं अपील कराल?

हा जामीनपात्र गुन्हा मानला जातो. अंतिम निर्णय होईपर्यंत ती व्यक्ती तुरुंगात जात नाही. जर एखाद्याला यासाठी शिक्षा झाली असेल, तर तो फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३८९(३) अंतर्गत ट्रायल कोर्टासमोर आपला अर्ज सादर करू शकतो.

Web Title: Did your check bounce Know what your rights are know details banking rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक