Lokmat Money >बँकिंग > Personal Loan घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात

Personal Loan घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात

पाहा पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणं आहे महत्त्वाचं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:13 PM2022-08-25T18:13:17+5:302022-08-25T18:13:48+5:30

पाहा पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणं आहे महत्त्वाचं.

Do not make these mistakes while taking Personal Loan it can be costly in the future know everything about loan | Personal Loan घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात

Personal Loan घेताना अजिबात करू नका या चुका, पुढे जाऊन पडू शकतं महागात

अचानक पैशांची गरज भासल्यास अनेकदा पर्सनल लोन हा उत्तम पर्याय मानला जातो. तुमच्या घरात कोणाचं लग्न असेल, घर खरेदीसाठी पैसे कमी पडत असतील किंवा आजारपणासाठी किंवा इतर कोणत्याही गरजा भागविण्यासाठी असो, पर्सनल लोन घेताना कोणत्याही प्रकारची गॅरंटी किंवा सिक्युरिटीची आवश्यकता नसते. हे एक अनसिक्युर्ड प्रकारातील कर्ज आहे, ज्यासाठी होम लोन किंवा गोल्ड लोन प्रमाणे तारण किंवा सिक्युरिटी जमा करण्याची आवश्यकता नसते. इतर कर्जांप्रमाणे, कोणतीही विशेष औपचारिकता पूर्ण करण्याची आवश्यकता नाही. पर्सनल लोन घेणे तुलनेने खूप सोपे आहे आणि अडचणीच्या वेळी ते कामी येते. पण घाईगडबडीत पर्सनल लोन  घेण्यासाठी काही चुका करू नका, अन्यथा तुमच्यासाठी त्रास खूप वाढू शकतो.

व्याजदर असतो अधिक

पर्सनल लोन तुमच्या गरजा नक्कीच पूर्ण करू शकते, परंतु त्याचे व्याजदर इतर कर्जाच्या तुलनेत खूप जास्त असतात. पर्सनल लोनचे व्याजदर १२ ते २४ टक्क्यांपर्यंत असू शकतात. अशा परिस्थितीत कर्जदाराला यासाठी मोठा ईएमआय द्यावा लागतो. म्हणूनच, पर्सनल लोन घेण्यापूर्वी त्यासाठी स्वत: ला मानसिकदृष्ट्या तयार करा, जेणेकरून नंतर तुम्हाला ईएमआय भरताना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये.

या गोष्टी ठेवा लक्षात

  • कधीही घाईगडबडीत पर्सनल लोन घेऊ नका. कर्ज घेण्यापूर्वी, तुम्ही बँकेच्या काही शाखांना भेट देऊन माहिती गोळा करा किंवा पर्सनल लोनचे व्याजदर जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या. व्याज कमी असेल तिथून कर्ज घ्या.
     
  • कर्ज घेतल्यानंतर, वेळेवर ईएमआयची परतफेड करा. वेळेवर कर्जाचे हप्ते न भरल्यास याचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. क्रेडिट स्कोअर कमी असल्यास भविष्यात कर्ज घेताना समस्या येऊ शकते.
     
  • गरज नसताना जास्त कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर मोठा ईएमआय भरावा लागेल आणि त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. जितकी रक्कम तुम्ही सहज फेडू शकता तितकेच कर्ज घ्या. बँकेच्या साइटवर सध्याच्या ईएमआय कॅल्क्युलेटरवरून तुम्हाला किती ईएमआय द्यावा लागेल याची माहिती घेऊ शकता.
     
  • दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणं टाळा. हे नक्कीच तुमचा हप्ता कमी करेल, परंतु त्या बदल्यात तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागेल. कमी कालावधीचा हप्ता मोठा असेल, पण त्यावर जास्त व्याज लागणार नाही.
     
  • फ्लॅट रेटच्या फंदात कधीही पडू नका, हा ग्राहकांची दिशाभूल करण्याचा मार्ग आहे. तुमच्या कर्जाचा हप्ता केव्हा महागणार आहे याची तुम्ही कधीही माहिती घेऊ शकत नाही.

Web Title: Do not make these mistakes while taking Personal Loan it can be costly in the future know everything about loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक