Join us  

तुम्हालाही लोन घ्यायचे आहे?  कोणत्या बँका देत आहेत स्वस्तात कर्ज? एकदा यादी पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 11:43 AM

वाढीव व्याजदराचा कल असतानाही काही बँका आणि गृह वित्त कंपन्या मात्र अजूनही स्वस्त व्याजदराने गृहकर्ज देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क । आरबीआयने यंदा रेपो दरात ४ वेळा वाढ केली. त्यामुळे रेपो दर १.९० टक्क्यांनी वाढला आहे. ३० सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दर ५० आधार अंकांनी वाढविला होता. त्यामुळे सगळी कर्जे महागली आहेत. एचडीएफसी, एसबीआय, आयसीआयसीआय, बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांनी गृहकर्जाचा व्याजदर वाढविला आहे. वाढीव व्याजदराचा कल असतानाही काही बँका आणि गृह वित्त कंपन्या मात्र अजूनही ८ टक्के इतक्या स्वस्त व्याजदराने गृहकर्ज देत आहेत.

या बँकांनी वाढविले व्याजदर

एसबीआयने बाह्य मानक उसनवारी दर (ईबीएलआर) ०.५ टक्क्यांनी वाढवून ८.५५ टक्के केला. आयसीआयसीआय बँकेने ईबीएलआर वाढवून ९.२५ टक्के केला. त्याबरोबरच बँकेने मार्जिनल रेट ऑफ लेंडिंग (एमसीएलआर) वाढवून ८.१० टक्के केला. म्हणजेच आता बँक किमान ८.१० टक्के दराने गृहकर्ज देईल.

व्याजदर आणखी वाढणार?

महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकांकडून पुन्हा एकदा ग्राहकांना व्याजदरवाढीचा झटका बसू शकतो. वाढती महागाई कमी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने आरबीआयवर सोपविली असल्याने आरबीआय कठोर निर्णय घेत आहे. अशावेळी ग्राहकांनी स्वस्त कर्ज देणाऱ्या बँकेत कर्ज ट्रान्सफर करावे. याशिवाय कर्जाचा हप्ता कमी न करता ठरावीक रक्कम जमा करून ती कर्ज कमी करण्यासाठी वापरावी.

कर्जाची किती वर्षे वाढली?

- रेपो दरात वाढ केली की बँका व्याज दरवाढीचा बोझा ग्राहकांवर टाकतात. गेल्या पाच महिन्यांत गृहकर्जाचा दर ६.५ टक्क्यांवरून ८.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

- म्हणजेच जर २० वर्षांसाठी कर्ज घेतले असेल तर ते फेडण्यासाठी आता २५ वर्षे लागणार आहेत. जर तुम्हाला वर्षे वाढवून घ्यायचे नसतील तर कर्जाचा हप्ता वाढवण्याचा मार्ग आहे. 

- मात्र यामुळे तुमच्या इतर बचतीवर आणि घरखर्चासाठी पैसे शिल्लक राहतील, याकडेही लक्ष द्यायला विसरू नका.

या बँका/वित्तीय संस्था देत आहेत ७५ लाख रुपयांपर्यंत स्वस्त कर्ज

सेंट्रल बँक    ७.४० ते ८.५५%युनियन बँक    ७.७५ ते ९.६५%एसबीआय    ७.८५ ते ८.६५%कोटक महिंद्रा    ७.९९ ते ८.७५%बँक ऑफ बडोदा    ७.९५ ते ८.६५%आयडीबीआय    ८.० ते १०.६५%करूर वैश्य बँक    ८.० ते ८.३०%एसआयसी हाउसिंग ८.० ते ९.२५%कॅनरा बँक    ८.०५ ते ११.०%ॲक्सिस बँक    ८.१० ते ११.४०%आयसीआयसीआय ८.१० ते ८.८०%पीएनबी         ८.१५ ते ९.१५%बँक ऑफ महाराष्ट्र     ८.२० ते ११.७०% 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र