Lokmat Money >बँकिंग > आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश!

आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश!

ATM मध्ये कमी चलनाच्या नोटांची खूप मागणी असते. सामान्यत: लोकांना कमी किमतीच्या नोटांमधून व्यवहार करणं सोपं जातं.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 07:00 PM2023-04-03T19:00:38+5:302023-04-03T19:02:18+5:30

ATM मध्ये कमी चलनाच्या नोटांची खूप मागणी असते. सामान्यत: लोकांना कमी किमतीच्या नोटांमधून व्यवहार करणं सोपं जातं.

easily withdraw 100 200 rupees notes from atm government issues order | आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश!

आता ATM मधून सहजपणे मिळणार १०० रुपयांच्या नोटा, सरकारनं दिला महत्वाचा आदेश!

ATM मध्ये कमी चलनाच्या नोटांची खूप मागणी असते. सामान्यत: लोकांना कमी किमतीच्या नोटांमधून व्यवहार करणं सोपं जातं. मग ते रिक्षाचं भाडं देणं असो किंवा मग लहान मुलांना खाऊसाठी पैसे देताना असो. पण ATM मधून नेहमी ५०० आणि २०० रुपयांच्या नोटाच अधिक मिळत असल्यानं सुट्टे करण्याची नामुष्की ओढावते. आता ही अडचण फार दिवस राहणार नाही. तुम्ही आता सहजपणे ATM मधून १०० च्या नोटा निघू शकणार आहेत. सरकारनं नुकतंच यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. 

बनावट नोटा रोखण्यासाठी सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. यासाठी सरकारनं एटीएममध्ये छोट्या नोटांचा समावेश करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आता एटीएममधून 100, 200 च्या नोटा सहज मिळू शकतात. त्याचबरोबर बनावट नोटांविरोधात सरकार अनेक पातळ्यांवर कारवाई करत आहे.

देशात नोटाबंदीनंतर आतापर्यंत केवळ ८४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पीएमएलए अंतर्गत आठ प्रकरणं हाती घेण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं लेखी उत्तरात म्हटलं आहे की, हे थांबवण्यासाठी एनआयएकडून बनावट भारतीय नोटांवर बंदी घालण्यासाठीची चौकशी सुरू आहे. दहशतवादी संघटनेला पैसे देण्याचे प्रकरणही समोर आले असून त्यात अनेक एजन्सी गुंतल्या आहेत.

यासाठी एफआयसीएन या नोडल एजन्सीच्या तस्कराची माहिती आणि विश्लेषण करण्यासाठी देशाच्या शेजारी देशासोबत एक संयुक्त टीम तयार करण्यात आली असून, ती कार्यरत आहे.

अधिकाऱ्यांना दिलं जातंय प्रशिक्षण

  • मंत्रालयानं स्पष्टपणे म्हटलं आहे की २०१५ मध्ये महात्मा गांधी मालिका-2005 मध्ये आरबीआयनं जारी केलेल्या सर्व नोटांमध्ये नवीन नंबरिंग पॅटर्न आणि फोटो लावण्यात आले होते. ज्याच्या मदतीनं लोक खऱ्या आणि खोट्या नोटा सहज शोधू शकता येणार आहेत.
  • सर्वसामान्यांसाठी, त्याची संपूर्ण माहिती आरबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे, जी सहज मिळवता येईल.
  • मोठ्या नोटांव्यतिरिक्त, RBI नं आपल्या काउंटरवर किंवा MTM वरून 100 आणि त्याहून अधिकच्या नोटा जारी करण्यास सांगितलं आहे.
  • तपासणीसाठी सर्व बँकांमध्ये मशिन बसवण्यात आल्या आहेत.
  • RBI ने बनावट बँक नोटांच्या शोध आणि अहवालावर एक मास्टर सर्कुलर जारी केले आहे, जे बनावट बँक नोटांच्या शोधासाठी अवलंबल्या जाणाऱ्या प्रणाली आणि प्रक्रियेच्या व्यापक प्रसारासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, असे लेखी माहितीमध्ये म्हटलं आहे.

Web Title: easily withdraw 100 200 rupees notes from atm government issues order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :atmएटीएम