Join us

तुमचं जॉइंट खाते असेल तर सावध व्हा! अकाउंटमधून ९ कोटी उडवले! एक चूक बँकेला महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:51 PM

safe bank account : एका खासगी बँकेच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून हा गुन्हा करण्यात आला आहे.

safe bank account : अनेकदा आपण बायको किंवा व्यावसायिक सहकाऱ्यांसोबत बँकेत संयुक्त खाते (Joint Account) उघडतो. जर तुमचे असेच खाते असेल तर तुम्हाला त्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. कारण एका कंपनीच्या संयुक्त खात्यातून ९ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एका खासगी बँकेच्या तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा हा गुन्हा दाखल केला आहे. वास्तविक, कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून एकाने हा गुन्हा केला आहे. अशा परिस्थितीत, संयुक्त खात्यातील फसवणूक टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे माहिती असणे आवश्यक आहे.

काय आहे प्रकरण?अ‍ॅक्सिस बँकेच्या एका शाखेत ही घटना घडली. एका अनोळखी व्यक्तीने आपण संबंधित कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून खात्यात रजिस्टर मोबाईल क्रमांक बदलण्याची विनंती केली. यासाठी बँकेसमोर बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंगचा एक्सेस मिळविण्यासाठी बँकेकडे आणखी एक विनंती केली. आश्चर्याची बाब म्हणजे यासाठी देखील बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळाल्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी कंपनीच्या खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले. अ‍ॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खात्यातील मोबाईल क्रमांक बदलण्याची विनंती ७ जून रोजी करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकाने सांगितले.

अशा घटना टाळण्यासाठी काय करावे?

  • जॉइंट अकाऊंट असो की सिंगल अकाउंट, आपल्या बँक खात्याचे व्यवहार नियमित चेक करा. आजकाल मोबाईलवर सर्व माहिती उपलब्ध होते.
  • विशेषतः जेव्हा खात्यात कोणताही मोठा व्यवहार दिसला तर यासाठी अकाऊंट स्टेटमेंट नियमितपणे तपासा.
  • टू फॅक्टर ऑथेन्टिकेशनचा वापर करा. यामुळे तुमच्या बँक खात्यातील प्रत्येक क्रिया पूर्ण करण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक असेल.
  • नियमित अंतराने बँक खात्यांमध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट करत रहा. यासाठी बँकेत जाऊन केवायसी करून घ्या. यासोबतच मजबूत पासवर्डसह इंटरनेट बँकिंग वापरा आणि ते नियमितपणे अपडेट करत रहा.
टॅग्स :सायबर क्राइमबँकबँकिंग क्षेत्र