Lokmat Money >बँकिंग > विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना

विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. लोकांना आर्थिक मदत करणं हा या योजनांचा उद्देश आहे. पाहूया कोणती आहे ही सरकारची योजना.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 03:17 PM2024-11-02T15:17:11+5:302024-11-02T15:17:11+5:30

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. लोकांना आर्थिक मदत करणं हा या योजनांचा उद्देश आहे. पाहूया कोणती आहे ही सरकारची योजना.

Get a loan of up to 3 lakhs without guarantee at such a low interest rate See what PM Vishwakarma scheme of Govt | विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना

विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते. लोकांना आर्थिक मदत करणं हा या योजनांचा उद्देश आहे. अशीच एक योजना म्हणजे पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana). या योजनेतून लोकांना आर्थिक मदत केली जाते. चला तर मग जाणून घेऊया काय आहे पीएम विश्वकर्मा योजना.

पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana)

पीएम विश्वकर्मा योजनेत सरकार लोकांना विनागॅरंटी स्वस्त व्याजदरात कर्ज देते. इतकंच नाही तर १५००० रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेत लोकांना ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. हे कर्ज केवळ ५ टक्के व्याजदरानं दिलं जातं. योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख आणि दुसऱ्या टप्प्यात २ लाखांचं कर्ज दिलं जातं. या योजनेत १८ पारंपारिक कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्याअंतर्गत लोकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जातं.

या योजनेत लोकांना १८ पारंपारिक कौशल्य व्यवसायांचं प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये दरमहा ५०० रुपये विद्यावेतन दिलं जातं. १८ ते ५० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

अर्ज कसा करावा?

पीएम विश्वकर्मा योजनेत अर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmvishwakarma.gov.in जाऊन केला जाऊ शकतो. त्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँकेचं पासबुक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे.

Web Title: Get a loan of up to 3 lakhs without guarantee at such a low interest rate See what PM Vishwakarma scheme of Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.