तुम्हालाही पैशांची गरज असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कमी व्याजदरात तुम्ही हजारो रुपयांचे कर्ज घेऊ शकता. होय... Google आता तुम्हाला ₹ १५००० पर्यंतचे कर्ज देणार आहे. तेही अत्यंत स्वस्त ईएमआयवर. टेक जायंटनं जी पे अॅप्लिकेशनवर (Google Pay) सॅशे लोन लॉन्च केले आहे. या अंतर्गत गुगल भारतातील छोट्या व्यवसायिकांना १५ हजार रुपयांपर्यंतचं कर्ज देणार आहे.
व्यावसायिक हे कर्ज १११ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत फेडू शकतील. गुगल इंडियानं यासंदर्भातील माहिती दिली. भारतातील व्यावसायिकांना छोट्या कर्जाची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी लहान व्यावसायिकांना १५ हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देईल, ज्याची परतफेड १११ रुपयांच्या सुलभ रकमेत करता येईल, असं कंपनीनं म्हटलं गुगलनं गुगल फॉर इंडियाच्या वार्षिक कार्यक्रमात याची घोषणा केली.
अधिक सुरक्षित
Google Pay ने भारतात १२ हजार कोटी रुपयांचे घोटाळे थांबवले आहेत. कंपनीनं कर्ज देणारी ३५०० अॅप्स काढून टाकली आहेत. गुगल पे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि शक्तिशाली बनले आहे. हे सध्या उत्कृष्ट रिअल-टाइम कोड-लेव्हल स्कॅनिंगसह येतं. Google Pay वर, आम्ही लोकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत संशयास्पद व्यवहारांबद्दल ताबडतोब अलर्ट केलं आणि फसवणूकीचे प्रयत्न तात्काळ थांबवले. यामुळेच गेल्या एका वर्षात गुगल पेने १२,००० कोटी रुपयांचे घोटाळे थांबवले असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली.
Our experience with merchants has taught us that they often need smaller loans and simpler repayment options.
— Google India (@GoogleIndia) October 19, 2023
To meet this need, sachet loans on Google Pay with @DMIFinance will provide flexibility and convenience to SMBs, with loans starting at just 15,000 rupees and can be… pic.twitter.com/SehpcQomCA
वित्तीय संस्थांसोबत करार
याशिवाय गुगलनं देशातील प्रमुख वित्तीय संस्थांसोबत भागीदारी केली आहे. सध्या एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक सारख्या भागीदारांसह टियर-टू शहरांसाठी ३० हजार रुपयांपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या लोकांसाठी थेट Google Pay वर कर्ज दिलं जात आहे.