Join us  

सारखी मिळतेय Credit Card लिमिट वाढवण्याची ऑफर, पाहा कोणाला होतो फायदा आणि कोण फसतं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 1:09 PM

प्रथमदर्शनी तुम्हाला लिमिट मोफत वाढतंय असा विचार मनात येईल. परंतु यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

बहुतांश क्रेडिट कार्ड (Credit Card) कंपन्या आपल्या ग्राहकांचं प्रत्येक ट्रान्झॅक्शन आणि त्यांच्या खर्चाच्या पॅटर्नवर लक्ष ठेवून असतात. सोबतच त्या ग्राहकांच्या सिबिल स्कोअरवरही लक्ष ठेवून असतात. ज्या ग्राहकांची क्रेडिट कार्ड वापरण्याची पद्धत चांगली असते, म्हणजेच जे चांगल्या प्रकारे आपलं क्रेडिट कार्ड वापरतात आणि बिलही वेळएवर भरतात किंवा डिफॉल्ट करत नाहीत, तेव्हा कंपन्या ग्राहकांना क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर देतात. प्रथमदर्शनी तुम्हाला हे लिमिट मोफत वाढतंय असा विचार मनात येईल. परंतु यापूर्वी तुम्हाला काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे.

खर्च किती आहे हे पाहाजर तुम्हाला क्रेडिट कार्ड लिमिट वाढवण्याची ऑफर स्वीकारायची असेल तर पहिले तुमचा खर्च किती आहे हे पाहा. जर तुमच्या सध्याच्या लिमिटच्या तुलनेत तुमचा खर्च अधिक असेल तर तुम्ही क्रेडिट लिमिट वाढवण्याची ऑफर स्वीकारू शकता.

कोणी ऑफर घेऊ नये...जर तुम्हाला शॉपिंगची आवड असेल आणि कार्डाच्या मदतीनं काही ना काही खरेदी करत असाल तर तुम्हाला या ऑफरकडे दुर्लक्ष करायला हवं. जेव्हा तुम्ही कार्डाचं लिमिट वाढवता तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे आता लिमिट अधिक आहे असं वाटू शकतं. अशातच तुम्हाला ईएमआयवरही सामान घेण्यास प्रवृत्त केल्यास तुम्ही तेदेखील घेऊ शकता. तुम्ही जरी ईएमआयवर सामान घेतलं तरी तुम्ही संपूर्ण रक्कम ब्लॉक होते. 

जर तुम्ही क्रेडिट कार्डावर जास्त सामान ईएमआयवर घ्याल, तर सुरुवातीला तुम्हाला ईएमआयचा बोजा थोडा कमी वाटेल. परंतु हळूहळू तो वाढत जाईल. काही महिन्यानंतर तुमच्या सॅलरीचा एक भाग तो ईएमआय फेडण्यात जातोय असं तुम्हाला जाणवेल. तुम्ही अधिक शॉपिंग करत असाल तर क्रेडिट कार्डाचं लिमिट बिलकुल वाढवू नका.

असं बाहेर पडू शकताजर तुमच्यावर क्रेडिट कार्डामुळे मोठं कर्ज झालं असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्डाचा वापर मर्यादित करायची गरज आहे. तुम्ही तुमचं आऊटस्टँडिंग त्वरित फेडा. गरज भासल्यास पर्सनल लोन घेऊन ते फेडता येऊ शकतं. पर्सनल लोन तुम्हाला १२ ते १४ टक्क्यांवर मिळू शकतं. परंतु क्रेडिट कार्डाच्या आऊटस्टडिंगवर तुम्हाला ३०-४२ टक्के व्याज द्यावं लागू शकतं. हे पर्सनल लोनच्या दराच्या तुलनेत तिप्पट आहे. तुम्ही क्रेडिट कार्डाचा कमीतकमी वापर कराल याची खात्री करा.

क्रेडिट कार्डाचं बिल फेडायची दुसरी पद्धत म्हणजे शिल्लक रक्कम ईएमआयमध्ये कनव्हर्ट करा. उदाहरणार्थ जर तुमचं बिल १ लाख रुपये असेल आणि तुम्हाला ते एकत्र फेडता येत नसेल तर तुम्ही त्याचा ईएमआय करून घेऊ शकता. ईएमआय केल्यास तुम्हाला मोठं व्याज द्यावं लागणार नाही.

टॅग्स :बँकव्यवसाय