Vande Bharat PNB: देशात सध्या ५० हून अधिक वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. मार्च २०२७ पर्यंत ४०० वंदे भारत गाड्या चालवण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय. १२० वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची जबाबदारी भारत आणि रशियाचा संयुक्त उपक्रम असलेल्या किनाटे रेल सोल्युशन्सला देण्यात आली आहे. यात रेल विकास निगमचा २५ टक्के, रशियन कंपनी मेट्रोवॅगनमॅशचा ७० टक्के आणि लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्सचा ५ टक्के हिस्सा आहे. 'द हिंदू बिझनेसलाइन'नं दिलेल्या वृत्तानुसार, कंपनी पुढील वर्षापासून महाराष्ट्रातील लातूर प्रकल्पात वंदे भारत ट्रेनचं उत्पादन सुरू करू इच्छिते आणि त्यासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून ४५० ते ५०० कोटी रुपयांचे कर्ज मागत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जाला रशियाची कंपनी स्बरबँक रॉसी पाठिंबा देईल, जी या प्रकल्पासाठी सॉवरेन गॅरंटर आणि फायनान्सर म्हणून काम करत आहे. किनेट रेल सोल्युशन्सला २०२३ मध्ये १२० वंदे भारत ट्रेन तयार करण्याचं कंत्राट मिळालंय. प्रत्येक गाडीला १६ डबे असतील. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कंपनीला वर्किंग कॅपिटलची गरज भासणार असून त्यासाठी बँकेशी बोलणी सुरू आहेत.
घर घेताना पत्नीला बनवलं Co-owner तर मिळतील फायदेच फायदे, Loan पासून टॅक्सपर्यंत वाचतील लाखो रुपये
केव्हा बनणार ट्रेन्स?
कंपनीनं सीजी पॉवरला ४५० कोटी रुपयांचे कंत्राट यापूर्वीच दिलं आहे. इंजिन, पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक कंपोनेंट्स बसवण्याचं कंत्राट आहे. गाड्यांच्या इंटिरिअर डिझाइनसाठी लवकरच निविदा निघण्याची शक्यता आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नांना किनेट यांनी उत्तर दिलं नाही. रेल्वेच्या डिझाइनबाबत आधीच प्रदीर्घ वाटाघाटी सुरू होत्या, त्यामुळे हा प्रकल्प बराच लांबणीवर पडला आहे. रेल्वेला १६ ऐवजी २४ डब्यांची गाडी हवी होती. अखेर त्यांनी मूळ करार स्वीकारला. जून २०२६ मध्ये प्रोटोटाइप तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर चाचण्या घेतल्या जातील आणि त्यानंतर गाड्यांचं बांधकाम सुरू होईल.