Join us  

जागतिक बँकर अंशू जैन यांचे निधन, कर्करोगाशी झुंज अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 5:04 AM

Anshu Jain : जैन हे डॉइशे बँकेत २०१२ ते २०१५ या कालावधीत सह-मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी बँकेत परिवर्तनाची भूमिका बजावली आणि तिला जागतिक स्तरावर नाव मिळवून दिले.

न्यूयॉर्क : जयपूर ते युरोपातील डॉइशे बँकेच्या शिखरा पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या अंशू जैन (५९) यांचे शनिवारी पहाटे लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. जैन हे डॉइशे बँकेत २०१२ ते २०१५ या कालावधीत सह-मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी बँकेत परिवर्तनाची भूमिका बजावली आणि तिला जागतिक स्तरावर नाव मिळवून दिले. जैन हे गेल्या पाच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. लंडन येथे ते अनेक वर्षांपासून राहत होते. कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पहिल्या चार वर्षांत जैन यांनी इच्छाशक्तीच्या बळावर आजाराशी लढा दिला होता. जैन यांनी करिअरची सुरुवात वॉल स्ट्रीटमध्ये मेरिल लिंचसोबत केली होती.

टॅग्स :बँकअमेरिका