नवी दिल्ली :
आरबीआयने महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे कर्जे महागली आहेत. मात्र, मुदत ठेवींवर अर्थात एफडीवरही बँकांनी व्याजदर वाढविले आहेत. त्यामुळे ठेवींवर ग्राहकांना जास्त परतावा मिळत आहे. व्याजदरात आणखी वाढ हाेण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुदत ठेवींना चांगले दिवस आले असून गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होत आहेत.