Google Pay Loan: गुगल इंडियाने (Google India) छोट्या व्यापाऱ्यांना मदत करण्यासाठी गुगल पे ऍप्लिकेशनद्वारे (Google Pay App) कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. गुगल इंडियाने सांगितले की, भारतातील व्यापाऱ्यांना अनेकदा छोट्या कर्जाची गरज असते. ही गरज लक्षात ठेवून Google Pay व्यापाऱ्यांना 15,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देणार आहे, ज्याची परतफेड 111 रुपयांच्या सुलभ रकमेत करता येईल.
छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज देण्यासाठी Google Pay ने DMI Finance सोबत भागीदारी केली आहे. इतकंच नाही तर, Google Pay ने ePayLater च्या भागीदारीत व्यापार्यांसाठी क्रेडिट लाइन सक्षम करण्याची सुविधा देखील सुरू केली आहे. याचा वापर करुन व्यापारी सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी करू शकतील.
Our experience with merchants has taught us that they often need smaller loans and simpler repayment options.
— Google India (@GoogleIndia) October 19, 2023
To meet this need, sachet loans on Google Pay with @DMIFinance will provide flexibility and convenience to SMBs, with loans starting at just 15,000 rupees and can be… pic.twitter.com/SehpcQomCA
कर्ज कसे मिळणार?
तुम्हाला Google Pay वरून व्यवसायासाठी कर्ज हवे असल्यास सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅपवर खाते असणे आवश्यक आहे. तुम्ही 8 स्टेप्समध्ये Google Pay द्वारे व्यवसायासाठी कर्ज मिळवू शकता.
- सर्वप्रथम तुमचे Google Pay for Business अॅप उघडा.
- यानंतर लोन्स विभागात जा आणि ऑफर्स टॅबवर क्लिक करा.
- तेथे तुम्हाला हवी असलेली कर्जाची रक्कम निवडावी लागेल आणि Get start वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुमच्या Google खात्यात लॉगिन करा. तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती द्यावी लागेल. तसेच कर्जाची रक्कम आणि किती कालावधीसाठी कर्ज घेतले, हे ठरवावे लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या कर्जाला रिव्ह्यू करावे लागेल आणि ई-साईन करावी लागेल.
- हे सर्व केल्यानंतर तुम्हाला काही केवायसी कागदपत्रे सबमिट करावी लागतील, ज्याद्वारे तुमची पडताळणी केली जाईल.
- यानंतर EMI पेमेंटसाठी तुम्हाला Setup eMandate किंवा Setup NACH वर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल, जे तुम्ही अॅपच्या माय लोन सेक्शनमध्ये पाहू सकता.
गुगल-पेने रोखले घोटाळे
Google Pay ने भारतात 12 हजार कोटी रुपयांचे घोटाळे थांबवले आहेत. कंपनीने कर्ज देणारी 3500 अॅप्स काढून टाकली आहेत. गुगल पे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आणि शक्तिशाली बनले आहे. हे सध्या उत्कृष्ट रिअल-टाइम कोड-लेव्हल स्कॅनिंगसह येते. Google Pay वर लोकांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत संशयास्पद व्यवहारांबद्दल ताबडतोब अलर्ट केले जाते. यामुळेच गेल्या एका वर्षात गुगल पेने 12000 कोटी रुपयांचे घोटाळे थांबवले असल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली.