Join us  

तुमच्या पैशांवर झाल्या सरकारी बँका मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 11:07 AM

पीएनबी वगळता इतर सर्व बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे.

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची आर्थिक वर्ष २०२३ मध्ये भरघोस कमाई झाली आहे. सरकारी बँकांचा नफा एक लाख कोटी रुपयांच्या पार गेला आहे. यात जवळपास अर्धी हिस्सेदारी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) आहे.

पीएनबीच्या नफ्यात घटपंजाब नॅशनल बँकेचा (पीएनबी) शुद्ध नफा मात्र २७ टक्के घसरून २,५०७ कोटी रुपयांवर आला. पीएनबी वगळता इतर सर्व बँकांच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे.बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात सर्वाधिक वाढटक्केवारीच्या हिशेबाने महाराष्ट्र बँकेचा नफा सर्वाधिक १२६ टक्के वाढून २,६०२ कोटी रुपये झाला.बडोदा, कॅनरा बँकेचा नफा दहा हजार कोटींच्या पार बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेचा नफा दहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक राहिला आहे. बँक ऑफ बडोदाचा नफा १४,११० कोटी रुपये, तर कॅनरा बँकेचा नफा १०,६०४ कोटी रुपये राहिला.१००% वाढीसह युको बँक (१,८६२ कोटी रुपये) दुसऱ्या, तर ९४ टक्के वाढीसह बँक ऑफ बडोदा तिसऱ्या स्थानी आहे.१२ सरकारी बँकांचा नफा 

एसबीआय ५०,२३२ कोटीयुनियन बँक ८,४३३ कोटीइंडियन बँक ५,२८२ कोटीबँक ऑफ इंडिया ४,०२३ कोटीइंडियन ओव्हरसीज २,०९९ कोटीसेंट्रल बँक १,५८२ कोटीपंजाब अँड सिंध १,३१३ कोटी

टॅग्स :बँक