Lokmat Money >बँकिंग > UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स

UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स

गेल्या काही वर्षांत, अनेक ॲप्सनं भारतात एन्ट्री घेतलीये आणि आता युपीआय इकोसिस्टमला नवीन दिशा देण्यावर भर दिला जातोय. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 02:44 PM2024-04-20T14:44:21+5:302024-04-20T14:44:53+5:30

गेल्या काही वर्षांत, अनेक ॲप्सनं भारतात एन्ट्री घेतलीये आणि आता युपीआय इकोसिस्टमला नवीन दिशा देण्यावर भर दिला जातोय. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.

Government s new plan on UPI Payment new apps will compete with foreign apps npci plans | UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स

UPI Payment वर सरकारचा नवा प्लॅन, विदेशी Apps ना टक्कर द्यायला येणार ही नवी अ‍ॅप्स

युपीआयबाबत भारत सरकारकडून नवीन योजना आखल्या जात आहेत. देशाची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणाली फिनटेक स्टार्टअपवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार करतेय. गेल्या काही वर्षांत, अनेक ॲप्सनं भारतात एन्ट्री घेतलीये आणि आता युपीआय इकोसिस्टमला नवीन दिशा देण्यावर भर दिला जातोय. आज आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती देणार आहोत.
 

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) क्रेड (Cred), फ्लिपकार्ट (Flipkart), फॅम-पे (FamPay) आणि अ‍ॅमेझॉन पे (Amazon Pay) सारख्या ॲप्सच्या एक्झिक्युटिव्हना भेटण्याची योजना बनवली आहे. सध्या देशात गुगल पे आणि फोन पे ॲप्सचा बोलबाला आहे. पण आता या ॲप्सवरही लक्ष वळवण्याचा विचार केला जातोय. इतर कंपन्यांचा देशातील बाजारातील हिस्सा वाढविण्याचा विचार केला जात आहे.
 

गुगल पे - फोन पे चा शेअर अधिक
 

Google आणि Phone Pay चा जवळपास ८६ टक्के मार्केट शेअर आहे. याचा अर्थ बहुतेक युझर्स हेच ॲप्सच वापरतात. तर पेटीएमचा बाजारातील हिस्साही अचानक कमी झाला आहे. २०२३ च्या अखेरीस, पेटीएमचा बाजारातील हिस्सा १३ टक्के होता जो आता ९.१ टक्के इतका कमी झालाय. मात्र, यामागचं मोठं कारण म्हणजे आरबीआयचा निर्णय. पण या मार्केटमध्ये इतर ॲप्सचा वाटाही वाढला पाहिजे, अशी एनपीसीआयची इच्छा आहे.
 

मार्केट शेअर वाढवण्यासाठी निर्णय
 

अन्य कंपन्यांचे मार्केट शेअर कसे वाढतील यावर एनपीसीआय विचार करत आहे. , यासाठी काही सूटही दिली जाऊ शकते. याच्या मदतीनं अन्य ही सूट अन्य युझर्सनाही देऊ शकतील. दरम्यान, ही नवी अॅप्स युपीआय पेमेंटला कशी चालना देतील आणि किती युझर्स आपल्यासोबत जोडतील हे पाहावं लागणार आहे.

Web Title: Government s new plan on UPI Payment new apps will compete with foreign apps npci plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.