Lokmat Money >बँकिंग > हप्त्यातच अर्धा पगार गारद, सांगा घर घ्यायचे तरी कसे?

हप्त्यातच अर्धा पगार गारद, सांगा घर घ्यायचे तरी कसे?

यंदा गृहकर्जावरील व्याज वाढल्यामुळे लाेकांना घर खरेदी करणे महाग झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 09:25 AM2023-08-18T09:25:11+5:302023-08-18T09:26:25+5:30

यंदा गृहकर्जावरील व्याज वाढल्यामुळे लाेकांना घर खरेदी करणे महाग झाले आहे.

half salary in installments tell how to buy a house | हप्त्यातच अर्धा पगार गारद, सांगा घर घ्यायचे तरी कसे?

हप्त्यातच अर्धा पगार गारद, सांगा घर घ्यायचे तरी कसे?

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगताे. त्यासाठी गृहकर्जाचा पर्याय बहुतांश जण निवडतात. यंदा गृहकर्जावरील व्याज वाढल्यामुळे लाेकांना घर खरेदी करणे महाग झाले आहे. याचा माेठा परिणाम ईएमआयवर झाला असून पगारातील एक माेठा हिस्सा त्यातच जात आहे. 

ईएमआयचा सर्वाधिक ५५ टक्के भार मुंबईकरांवर आहे. रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘नाईट फ्रॅंक’ने यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. देशातील ८ प्रमुख शहरांचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. ईएमआय वजा झाल्यनंतर हातात फार कमी रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे घर घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

किती पगार जाताे ईएमआय फेडण्यात?

शहर            ईएमआय
अहमदाबाद        २३%
पुणे        २६%
काेलकाता        २६%
बंगळुरू        २८%
चेन्नई        २८%
दिल्ली        ३०%
हैदराबाद        ३१%
मुंबई        ५५%

 

Web Title: half salary in installments tell how to buy a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.