Join us

हप्त्यातच अर्धा पगार गारद, सांगा घर घ्यायचे तरी कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 9:25 AM

यंदा गृहकर्जावरील व्याज वाढल्यामुळे लाेकांना घर खरेदी करणे महाग झाले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगताे. त्यासाठी गृहकर्जाचा पर्याय बहुतांश जण निवडतात. यंदा गृहकर्जावरील व्याज वाढल्यामुळे लाेकांना घर खरेदी करणे महाग झाले आहे. याचा माेठा परिणाम ईएमआयवर झाला असून पगारातील एक माेठा हिस्सा त्यातच जात आहे. 

ईएमआयचा सर्वाधिक ५५ टक्के भार मुंबईकरांवर आहे. रिअल इस्टेट सल्लागार संस्था ‘नाईट फ्रॅंक’ने यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे. देशातील ८ प्रमुख शहरांचा त्यात आढावा घेण्यात आला आहे. ईएमआय वजा झाल्यनंतर हातात फार कमी रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे घर घ्यायचे तरी कसे, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे.

किती पगार जाताे ईएमआय फेडण्यात?

शहर            ईएमआयअहमदाबाद        २३%पुणे        २६%काेलकाता        २६%बंगळुरू        २८%चेन्नई        २८%दिल्ली        ३०%हैदराबाद        ३१%मुंबई        ५५%

 

टॅग्स :बँकिंग क्षेत्र