Lokmat Money >बँकिंग > Savings Account: अनेक सेव्हिंग अकाऊंट्स आहेत? बंद करण्यापूर्वी या ४ बाबींकडे दुर्लक्ष करू नका

Savings Account: अनेक सेव्हिंग अकाऊंट्स आहेत? बंद करण्यापूर्वी या ४ बाबींकडे दुर्लक्ष करू नका

आजच्या काळात, लोकांकडे एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट्स असणं सामान्य बाब आहे. परंतु अनेकदा ती खाती मेंटेन करणं कठीण होऊन बसतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 02:16 PM2023-08-16T14:16:09+5:302023-08-16T14:18:31+5:30

आजच्या काळात, लोकांकडे एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट्स असणं सामान्य बाब आहे. परंतु अनेकदा ती खाती मेंटेन करणं कठीण होऊन बसतं.

Have multiple savings accounts Don t ignore these 4 points before closing account | Savings Account: अनेक सेव्हिंग अकाऊंट्स आहेत? बंद करण्यापूर्वी या ४ बाबींकडे दुर्लक्ष करू नका

Savings Account: अनेक सेव्हिंग अकाऊंट्स आहेत? बंद करण्यापूर्वी या ४ बाबींकडे दुर्लक्ष करू नका

आजच्या काळात, लोकांकडे एकापेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट्स असणं सामान्य बाब आहे. परंतु अनेक वेळा खाती इतकी अधिक असतात की ती मेंटेन करणं कठीण होऊन बसतं. हे मुख्यतः अशा लोकांसोबत घडतं, जे खाजगी नोकऱ्या करतात आणि नोकरी बदलल्यानंतर कंपनी त्यांना नवीन बँकेत खातं उघडायला लावते. खाते चालू ठेवण्यासाठी त्यात किमान शिल्लक राखणे आणि वेळोवेळी व्यवहार करत राहणं आवश्यक आहे.

परंतु अधिक खाती झाल्यास त्या सर्वांना मॅनेज करणं सोपी गोष्टी राहत नाही. असा स्थितीत अकाऊंट बंद करणं फायद्याचं ठरू शकतं. परंतु तुमच्यासोबतही अशी स्थिती उद्भवली असेल, तर सेव्हिंग अकाऊंट बंद करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

खात्याचं स्टेटमेंट काढा
सेव्हिंग अकाऊंट बंद करण्यापूर्वी खात्याचे स्टेटमेंट काढा. तुम्ही त्याची प्रिंटआउट घेऊन सुरक्षितपणे ठेवू शकता किंवा डाउनलोड करून कुठेतरी सुरक्षित ठेवू शकता. जर तुम्ही हे खातं कर्जाचे ईएमआय भरण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी वापरत असाल, तर तुम्हाला भविष्यात त्याच्या स्टेटमेंटची आवश्यकता भासू शकते. त्यामुळे ते सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.

स्कीम लिंक आहे का पाहा
जे अकाऊंट बंद करायचे आहे, एकदा त्या खात्याशी कोणती स्कीम लिंक आहे का ते पाहा. तसंच कोणतीही स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर त्या खात्यात त्याचे पैसे येणार आहेत का नाही हे तपासून पाहा. अशा परिस्थितीत तुम्ही खातं बंद केल्यास तुम्हाला मिळणारे पैसे अडकू शकतात. असं असेल तर पहिले खातं अपडेट करा आणि नंतरच जुनं खातं बंद करा.

पेंडिंग चार्जेस फेडा
काही वेळा अनेक अकाऊंट्स असल्यानं खात्यात मिनिमम बॅलन्स मेंटेन करणं शक्य होत नाही. जर बॅलन्स निगेटिव्ह असेल तर बँक खातं बंद करण्याची परवानगी देत नाही. अशात बँकेचा सर्व्हिस चार्ज किंवा अन्य शुल्क पेंडिंग राहू शकतं. अशा स्थितीत खातं बंद करण्यापूर्वी हे सर्व शुल्क फेडा आणि त्यानंतर अकाऊंट मेंटेन करा. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअरही मेंटेन राहील.

क्लोजर चार्जची माहिती घ्या
सामान्यत: सेव्हिंग अकाऊंट सुरु केल्यानंतर १४ दिवस ते एका वर्षाच्या आत बंद केल्यास बँक शुल्क आकारू शकते. अकाऊंट क्लोजर चार्ज बाबत पहिलेच माहिती घेऊन ठेवा आणि एका वर्षाच्या आत अकाऊंट क्लोज करणं टाळा. 

Web Title: Have multiple savings accounts Don t ignore these 4 points before closing account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.