Join us

तुमच्या व्याजातून HDFC ने कमावले 27,385 कोटी रुपये, निव्वळ नफा 15,000 कोटींच्या पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 6:56 PM

HDFC Bank Q2 Result: देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचे तिमाही निकाल समोर आले आहेत.

HDFC Bank Q2 Result: देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC ने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जोरदार कमाई केली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत HDFC बँकेचा नफा 15,796 कोटी रुपये राहिला. या काळात बँकेच्या एकूण उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 70 टक्क्यांनी वाढून 78,406 कोटी रुपये झाले आहे. 

सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेने लोकांच्या व्याजातूनच 27,385 कोटी रुपये वसूल केले आहेत. प्रोव्हिजन्सबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर तिमाहीत हा 2904 कोटी रुपये होता. सप्टेंबर तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग नफाही 30.5 टक्क्यांनी वाढून 22,694 कोटी रुपये झाला आहे. एकूण कर्जाबद्दल बोलायचे तर सप्टेंबर तिमाहीत त्यात 1.34 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शेअर्समध्ये घसरणसोमवारच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.24 टक्क्यांनी घसरले. बँकेचे निकाल बाजार बंद झाल्यानंतर आले. या निकालाचा परिणाम उद्या शेअर्सवर दिसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. उत्कृष्ट निकालानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गेल्या एका महिन्यात एचडीएफसी बँकेचे शेअर्स सुमारे 6 टक्क्यांनी घसरले आहेत. आता बँकेच्या उत्कृष्ट निकालानंतर गुंतवणूकदारांना नफा मिळविण्याची संधी आहे. 

टॅग्स :एचडीएफसीबँकबँकिंग क्षेत्रगुंतवणूक