HDFC Bank Q4 Results: खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेनं जानेवारी-मार्च 2024 तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 चे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मार्च 2024 च्या तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ महसूल वार्षिक 133.6 टक्क्यांनी वाढून 807 अब्ज रुपये झाला आहे. एका वर्षापूर्वी ते 345.5 अब्ज रुपये होता. या तिमाहीत बँकेचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 39.9 टक्क्यांनी वाढून 176.2 रुपये झालाय. निकाल जाहीर करताना कंपनीनं 19.5 रुपयांचा डिविडंड देण्याचीही घोषणा केली.
बँकेनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार स्टँडअलोन आधारावर, मार्च 2024 तिमाहीत एचडीएफसी बँकेचा निव्वळ महसूल वार्षिक 47.3 टक्क्यांनी वाढून 472.4 अब्ज रुपये झाला आहे. यामध्ये सब्सिडायरी एचडीएफसी क्रेडिला फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमधील हिस्स्याच्या विक्रीतून 73.4 अब्ज रुपयांच्या व्यवहारातील नफ्याचाही समावेश आहे. या तिमाहीत स्टँडअलोन निव्वळ नफा वाढून 165.11 रुपये अब्ज झाला आहे जो एका वर्षापूर्वी 120.47 अब्ज रुपये होता.
व्याजातून मिळणारं उत्पन्न वाढलं
या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न 24.5 टक्क्यांनी वाढून 290.8 अब्ज रुपयांवर पोहोचलं आहे, जे एका वर्षापूर्वी याच कालावधीत 233.5 अब्ज रुपये होते. इतर उत्पन्न म्हणजेच बिनव्याजी महसूल 181.7 अब्ज रुपये नोंदवला गेलाय, जो एका वर्षापूर्वी 87.3 अब्ज रुपये होता.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये नफा किती?
आर्थिक वर्ष 2024 मध्ये बँकेचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 39.3 टक्क्यांनी वाढून 640.6 अब्ज रुपये झालाय. स्टँडअलोन आधारावर निव्वळ नफा 608.1 अब्ज रुपये राहिला, जो तुलनेत 37.9 टक्क्यांनी वाढला. या काळात स्टँडअलोन निव्वळ महसूल 1577.7 अब्ज रुपये होता, जो एका वर्षापूर्वी 1180.6 अब्ज रुपये होता.