Join us  

HDFC बँकेत अकाऊंट आहे? मग Fake SMS असा ओळखा, नाहीतर होईल मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 7:31 PM

सध्या SMSद्वारे बनावट लिंक पाठवून लोकांची फसवणूक केली जाते. बर्‍याच वेळा हे एसएमएस इतके खरे वाटतात की लोकांना बनावट मेसेज ओळखणं कठीण होतं.

सध्या SMSद्वारे बनावट लिंक पाठवून लोकांची फसवणूक केली जाते. बर्‍याच वेळा हे एसएमएस इतके खरे वाटतात की लोकांना बनावट मेसेज ओळखणं कठीण होतं. खोट्या मेसेजला बळी पडून लोकांचे कष्टाचे पैसे क्षणार्धात वाया जातात. परंतु एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी आता अशी माहिती शेअर केली आहे की जी ग्राहकांसाठी खूप फायदेशीर आहे.

एचडीएफसी बँकेने त्यांच्या ग्राहकांसाठी काही सोप्या टिप्स शेअर केल्या आहेत (Easy tips to identify Fake SMS) जेणेकरून ते बनावट एसएमएस सहज ओळखू शकतील. बँकेने आपल्या ऑथेंटिक SMSसाठी काही मानकं निश्चित केली आहेत.

बनावट SMS कसे ओळखावे१. बँकेचे स्पष्ट म्हणणे आहे की ते १० अंकी मोबाईल नंबरवरून कधीही एसएमएस पाठवत नाहीत.२. HDFC बँकेचे अधिकृत एसएमएस नेहमी HDFCBK किंवा HDFCBN च्या ID वरून पाठवले जातात.३. एचडीएफसी बँकेच्या एसएमएसमधील कोणतीही लिंक फक्त hdfcbk.io ने सुरू होते.४. बँकेने ग्राहकांनी त्यांच्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या प्रकारचे एसएमएस किंवा कोणते उपाय अवलंबले पाहिजेत याचे तपशील देखील शेअर केले आहेत.

बनावट एसएमएस टाळण्याचे मार्गएचडीएफसी बँक व्यतिरिक्त इतर बँकांकडून बनावट एसएमएस टाळण्यासाठी तुम्ही या पद्धती वापरू शकता. १. १० अंकी फोन नंबरवरून आलेल्या बँकेच्या एसएमएसला कधीही उत्तर देऊ नका.२. बँकेचे डिटेल्स मागणाऱ्या SMS किंवा WhatsApp मेसेजला अजिबात रिप्लाय देऊ नका.३. बँक कधीच आपल्या ग्राहकांकडे OTP, CVV, Aadhaar, PAN Card किंवा इतर खासगी माहिती SMS किंवा ई-मेलवर मागत नाही. ४. असे एसएमएस मिळाल्यावर, तुम्ही बँकेच्या फिशिंग रिस्पॉन्स सिस्टमवर तक्रार नोंदवावी. त्याची माहिती तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवरून मिळेल.५. तुम्ही बँकेच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावरही याबाबत तक्रार करू शकता.

SMS द्वारे अशी केली जाते फसवणूकफसवणूक करणारे सहसा बनावट MMS द्वारे तुमच्या बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर, त्या आधारे ते तुमच्या बँक खात्यातून रक्कम लुबाडण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ते एकतर बँक कर्मचारी असल्याची बतावणी करतात किंवा ईमेल, कोणत्याही लिंकद्वारे माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करतात.

टॅग्स :एचडीएफसी